पिंपळकोठें येथील बडगुजर समाज बांधव यांची पिंप्री खुर्द येथील कुलदैवत श्री चामुंडा माता मंदिरास सदिच्छा भेट – चि. रोहित मनोहर बडगुजर धरणगांव

पिंप्रीतील सर्व समाज बांधव यांनी आपले कुलदैवत श्री चामुंडा मातेचे मंदिर व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले व श्री. चामुंडा माते च्या आशिर्वाद, कृपेने बडगुजर समाज बांधवांनी दिलेल्या वर्गणीतून पिंप्री खुर्द येथे कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. ते प्रत्यक्षात दि. १४ नोव्हेंबर २०२० वार शनिवार रोजी मंदिराचे भूमिपुजन करण्यात आले. श्री. चामुंडा मातेचे दिनांक ४ दिंसेबर २०२० ला पाया भूमिपूजन केले आणि बांधकामास सुरुवात केली, दि. २२ नोव्हेंबर २०२० रोजी पिंप्री खुर्द ग्रामपंचायत कडून नळ कनेक्शन जोडण्यात आले. हळू हळू कामाला सुरुवात करत बडगुजर समाज बांधवांच्या वर्गणी सहभागातून मंदिर हे कळसा पर्यंत पूर्ण झाले.

बडगुजर समाज बांधव आहोत व आपले काही तरी देणं लागते आहे म्हणून पिंपळकोठा येथील समाज बांधव एकत्र येत सर्व समाज बांधवांनी स्वइच्छित वर्गणी देवून अवघ्या दोन दिवसात पिंप्री खुर्द येथे येऊन दि.२२/१/२०२२ रोजी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री यांच्या कडे रक्कम जमा केली. तसेच बडगुजर समाज पंच मंडळ धरणगांव यांच्या कार्यकारणी सर्व माजी व आजी सदस्य यांनीही धरणगांव बडगुजर बांधव यांना एकत्रित करून समाज बांधव एकत्र येत सर्व समाज बांधवांनी स्वइच्छित वर्गणी दिली व मंदिर बांधकाम करण्यासाठी आम्ही सर्व धरणगांववासी आपल्या बरोबर आहोत अशी ग्वाही दिली. श्री कुलस्वामिनी चांमुडा मातेचे मंदिर बांधकाम सुरू आहे, मंदिराचे कामकाज कुठ पर्यंत आले ते प्रत्यक्षपणे मंदिराची पाहणी व चर्चा करत असताना त्यांना खूप आनंद व प्रसन्नता जाणवली. आलेले समाज बांधवयांचा पिंप्री खुर्द येथे यांचा सत्कार समारंभ ह.भ. प. श्री. देविदास गुलाब बडगुजर महाराज यांनी आयोजित केला व यात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
श्री.सुनील बडगुजर सर यांनी प्रस्तवना सांगीतल्या नंतर आलेल्या मंडळींचे आभार मानले.
यावेळी श्री. गणेश सुभाष शेठ बडगुजर ( उद्योजक) यांनी देवीच्या मंदिरा साठी ३ ब्रास मार्बल देणार म्हणून सांगितले, व कै. पंडित तंगु शेठ बडगुजर रा. पिंपळकोठा यांच्या समरणार्थ श्री.शांताराम पंडित बडगुजर, श्री. बापु पंडित बडगुजर, भगवान पंडित बडगुजर व चि. मनोज संदीप बडगुजर यांच्या कडुन रूपये २१,०००/- एकवीस हजाराची देणगी दिली.

१) श्री. अशोक राजाराम बडगुजर यांचा सत्कार श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर( बडगुजर )यांनी केला

२) श्री.ज्ञानेश्वर महादू बडगुजर यांचा सत्कार श्री. सुरेश अर्जुन मोहकर यांनी केला


३) श्री. गणेश सुभाष बडगुजर यांचा सत्कार श्री. सुनील सर बडगुजर यांनी केला


४) श्री. भगवान पंडित बडगुजर यांचा सत्कार श्री. मधुकर बडगुजर यांनी केला


५) श्री. मनोज दत्तात्रय बडगुजर यांचा सत्कार श्री. पंडित दगडू मोहकर यांनी केला

यावेळी मंडळाचे श्री. हरिष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष), श्री. निलेश ईश्वर बडगुजर (सचिव), सहसचिव डिगंबर बडगुजर, जयेश पवार, श्री.अनिल बडगुजर मिस्त्री व मंडळाचे मार्गदर्शक श्री. विनोद श्रीराम मोहकर, श्री. योगेश दयाराम बडगुजर सर, उपस्थित होते.
🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या🚩🚩
मंदिर बांधकामासाठी जी देणगी दिली
त्या बद्दल पिंप्री खुर्द बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द आपले आभारी आहोत 🙏🙏धन्यवाद 🙏🙏 व्यक्त केले.

आपल्या सर्वांच्या सहकार्य ने एप्रिल १९ – मार्च – २० – पहिल्या वर्षाचे ऑडिट व एप्रिल २० – मार्च – २१ – दुसऱ्या वर्षाचे ऑडिट ही पुर्ण झाले

मंदिर समोरील सभामंडप बांधकाम ही सुरू झाले आहे

आम्ही आपणास आव्हान करत आहोत की आपण
पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द
पिंप्री खु।। ता. धरणगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*