महाराष्ट्र राज्यस्तरीय देहदान घोषवाक्य रचना स्पर्धेत धुळे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्री. सी. डी. साळुंखे सर यांचे रचित घोषवाक्य राज्यात प्रथम

चोपडा/धुळे येथील बडगुजर समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे लाडके मार्गदर्शक लेखनावर भक्कम पकड असलेले सेवानिवृत्त प्राध्यापक कृषी क्षेत्रात विशेष कार्य केलेले आपल्या लेखनाने सर्वांना प्रभावित करणारे असे आपणा सर्वांचे परिचित मा. प्रा. श्री. सी. डी. साळुंखे सर यांनी नुकत्याच राष्ट्रीय देहांगदान जागृती समिती संचालित देहांगदान साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या देहदान, नेत्रदान, अवयव दान या विषयानुसार स्पर्धकांना घोषवाक्य बनवून संस्थेस पाठवायची होती. त्या स्पर्धेत प्रा. सी. डी. साळुंखे सर यांनी आपला सहभाग नोंदविला होता. नुकताच या देहांगदान घोषवाक्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला यामध्ये

🖊️👑🏆 सर्वोत्कृष्ट

1) प्रा. सी. डी. साळुंखे. धुळे – प्रथम
2) उन्नती राजेंद्र बनसोड. यवतमाळ – व्दितीय
3) गणेश भालचंद्र कुलकर्णी. अहमदनगर – तृतीय

अशी निवड करण्यात आली.

त्यांना मिळालेल्या या यशामुळे बडगुजरांचा लेखन क्षेत्रात सुध्दा विशेष रूची असे दिसून येते.

सर्वोत्कृष्ट देहदान घोषवाक्य यासाठी प्रथम निवड झालेल्या प्राध्यापक सी. डी. साळुंखे यांच्याशी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, समाजातून लेखन क्षेत्राची आवड असलेल्या तरुणांना, युवकांना व लेखकांना यातून प्रेरणा मिळावी व त्यांनीसुद्धा लेखन करावे. यातच माझी सर्वोत्कृष्ट घोषवाक्यासाठी निवड झाल्याची फलश्रुती होईल.

त्यांना मिळालेल्या यशाबद्दल बडगुजर प्राऊड फाउंडेशन व बडगुजर.इन टिम व संपुर्ण बडगुजर समाज यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🙏🏻💐

3 Comments

  1. आदरणीय श्री साळुंखे सर यांचे अभिनंदन!

    बडगुजर वेब पोर्टल यांचे उत्तम कार्य.
    श्री लोकेश कोतवाल सर यांची या समाजसेवी कार्यात खुप अनमोल मेहनत.

  2. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन सर

Leave a Reply

Your email address will not be published.


*