आज गुड मॉर्निंग करायला मन तयार नाही ..
काही तरी .. खुप काही निसटून गेल्याची पोकळी निर्माण झाली
डॉ. सिंधुताई सपकाळ अर्थात आमची लाडकी माई.. जगाला तुझी ओळख तसीच तुझी माझी ओळख…
पण आज खरच पोरक झाल्यागत मलाही वाटत …
एखादयाच्या हृदयात जागा करायला .. माणूस ओळखीचा किंवा जवळचा किंवा नात्यातलाच असायला हव अस काही नसत ..माई तुझ्या सारखे अनमोल हीरे जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात घर करून राहतात ..
खरच सांगू माई आमच्या सारख २ मुलांची आई ४ मुलांची आई होवून त्याच ऊहापोह करण खुप सोप ..पण असंख्य अनाथांची माय होण .. त्यांना सांभाळन ..त्यांची काळजी घेण .. त्यांच्या पोटापाण्यासाठी पायपीट करण कठीण ..आमच्या सारख्या आय्या पोरांनी हे नको मला दुसरं दे खायला म्हटल्यावर ..घरात सर्व असतांना पाठीत धबाका घालायला कमी करत नाही…पण तु माई रस्त्यावरच्या अंनाथ मुलांना आपलसं करुन .. त्यांना चांगल जेवण मिळाव .. त्यांच्या निदान अंगात घालायला २ जोडी कपडे मिळावे ..ह्या महाकाय जगाच्या समूद्रात त्यांना टिकाव धरता येईल .. त्यासाठी त्यांना शिक्षण देण्यासाठी तुझी धडपड आख्या जगाने पाहिली आहे माई ..इथे लोकं स्वताच्यां१ ,२ मुलांना शिक्षण देतांना नाकेनवू येतात ..तिथे तू असंख्य डॉ , इंजिनिअर घडवले ..त्यासाठी तू लोकांन समोर पदर पसरला .. खरंच माई तुझ्यासारख आई होण आणखी दुसऱ्या कुणाला जमण कठीण ..अशक्यच आहे ..
माई खरं सांगू माझी आई देवा घरी गली .. त्यानंतर मी तुझ्यात माझी आई बघायची .. तुझ्या सारखीच तर होती ग माझी आई .. नवूवारी साडी .. कपाळावर गोल मोठा कुंकवाचा टिळा .. कानात मोत्यांची कुड .. हातात काचेच्या बांगड्या ..पायात मिळेल ती चप्पल ..मला कधी आठवत नाही की माझी आई माझ्या वडीलांन कडे साडी चोळी साठी रुसली किंवा भांडली .. साधं सरळ रुप तिचं डोईवरचा पदर कधी सरकला नाही .. अगदी तुझ्या सारखीच माझी आई .. ती गेली ..आणी मनोमन मी तीला तुझ्यात बघायची ..तुलाच माझी आई मानायची …एकदा तरी तु मला भेटशील .. कुठे तरी जगाच्या पाठीवर आपली भेट होईल ..मला माझी माय डोळेभरून बघता येईल असे मना पासून वाटायचे ..पण असे महान आत्मे सहजासहजी कुणाला भेटत नाही .. त्यासाठी तेव्हढी पुण्याई लागले ..तसे योग घडून यावे लागतात ..माई मी ५३ वर्षाची एक गृहीणी आहे ..पण ह्या वयात देखील मला आईची कमी खुप भासते .. माणूस कितीही मोठा होवो पण त्याला आईच्या मांडीवर डोक ठेऊन मोकळ होता येत … म्हणूनच तर ती म्हण आहे न ..स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी ..
माई काल रात्री मी टिव्ही वर बातम्या म्हधे बघीतले ..आमची सर्वांची आई ..अख्या जगाची आई ..माझी माई जग सोडून गेली ..माई तू अजून जायला नको होतस .. ह्या जगातील असंख्य लेकरांना तुझी गरज होती ..पण देवा पुढे कुणाचे चालते ..आणी त्यालाही तर तुझ्या सारख्या प्रेमळ आईची गरज आहेच की ..माई किती मन मोकळं करू असं झालंय .. जगासाठी तू एक अनाथांची माय … सिंधूताई सपकाळ होतीस ..कुणाची आई होतीस कुणाची माई होतीस ..माझ्या साठी देखील तु माझी माई होती ..तुझ्या कडून मी खूप काही शिकले माई ..पण प्रत्येकक्षाता आपली भेट झाली नाही माई .. कुठल्यातरी मेळाव्यात .. कुठे तरी सभेत कधी तरी अचानक तुझी भेट होईल ..पण ते राहीलच ..पण माई तु नेहमी माझ्या हृदयात राहशील .. चांगल्या ..वाईटाची जाणीव करून देशील ..आणी माई तुझ्यातला एक गुण घेण्याचा मी प्रयत्न केला आहे ..सर्वांशी प्रेमाने आणी मायेने वागायचे ..कधी कधी होते चुक ..पण परत चुक सुधारुन मायेने वागायचा प्रयत्न करते ..
माई मी तुझी आठवण तर सदैव माझ्या सोबत राहील कारण तु माझी आई होतीस ..मी तुझ्यात माझी आई बघत होती ..माई तुझा आशिर्वाद सदैव आमच्या पाठी असूदे ..माई पाणावलेल्या डोळ्यांनी मी तुला भावपूर्ण श्रद्धांजली वाहते ..🙏🙏💐😢😢
माई तू परत ये तुझी या जगाला खूप गरज आहे ….
Nice 👍
खूप चांगल मन मोकळे केले . खरच अशी माई पुन्हा होणे नाही . माईस भावपूर्ण श्रद्धांजली .