||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
आपण दर वर्षी नवीन काही तरी करण्याची संकल्पना अमरावती समाजबां धवांच्या मनामध्ये बरेच दिवसापासून सुरु होती.
तर समाजातील प्रत्येक घरात आपली कुलदैवत चामुंडा मातेचा फोटो असायला हवा अशी इच्छा सर्वांची होती, या हेतूने समाजातील प्रत्येकाच्या घरी फोटोचे वितरण करण्याचा निर्धार बडगुजर समाजातील युवक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तरी येत्या काही दिवसात चामुंडा मातेचे फोटो समाजातील प्रत्येक घरी पोहोचविण्याचा मानस युवकांचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ०१/०१/२०२२रोजी चामुंडा मातेचा फोटो प्रतिमा वितरणाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळासांय. ५:०० वाजता साई मंदिर, अमरावती येथे झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बडगुजर समाजाचे माजी अध्यक्ष श्री शरद उदारामजी दातेराव यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच कार्यक्रमाला अखिल भारतीय बडगुजर समाज समितीचे नवनिर्वाचित सदस्य आशिष पाटील, आजीवन सभासद श्री मनीष दातेराव, आनंद दातेराव किरण पाटील, शुभम वासेवाय, समाज बांधव मुकेश वासेवाय, हर्ष वासेवाय हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी श्री.हरीश भेरडे,श्री.सचिन भेरडे, निलेश कोतवाल, प्रवीण दातेराव, मुकुंद दातेराव, सौरभ भेरडे, सौ.नीलाक्षी दातेराव सौ.उमा अलोने, सौ.अर्चना भेरडे ,सौ.आराध्या रामसे,समस्त समाज बांधव हे उपस्थित होते
Leave a Reply