बडगुजर उत्कर्ष मंडळ ठाणे बृहमुंबई व कोकण परिसर आयोजित बडगुजर दर्शनचा २० वा दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा तसेच समाज गुणगौरव पुरस्कार व सत्कार सोहळा उत्साहात थाटामाटात संपन्न – श्री. उमेश लक्षण बडगुजर, ठाणे

दि. २५ डिसेंबर रोजी बडगुजर दर्शन च्या २० व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि समाज गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र मित्र मंडळ शाळा, उल्हासनगर-१ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण भिका बडगुजर(सर) तसेच बडगुजर दर्शन विशेषांक प्रकाशन हे नाशिक येथील शिवसेनेचे बुलंद नेतृत्व, महानगर प्रमुख माननीय श्री. सुधाकरभाऊ भिका बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष श्री. आनंदाशेठ धोंडू सुर्यवंशी (बडगुजर) तसेच महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूलचे अध्यक्ष श्री. विजयकुमार गणेश कुलकर्णी (सर ) उल्हासनगर १ तसेच बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष श्री. बापूसाहेब किसन बडगुजर आणि श्री. प्रकाश बबन बडगुजर, संपादक बडगुजर दर्शन हे कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले व मुंबई परिसर व समाजातील दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष श्री. बापू किसन बडगुजर यांनी केले तसेच आलेल्या सर्व मान्यवर व समाज बांधव यांचे स्वागत केले.

तद्नंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत सोहळा झाला. त्यानंतर श्री. सुधाकरभाऊ बडगुजर यांच्या हस्ते बडगुजर दर्शनचा २० व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. व मग विशेष सत्कार सोहळा करण्यात आला.

बडगुजर समाज बांधवांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेली असून विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केलेले अशा समाज बांधवांचा व भगिनींचा विशेष सत्कार उत्कर्ष मंडळातर्फे करण्यात आला. तसेच कोरोना काळात समाज बांधवांना मदत कार्य करणाऱ्या डॉक्टर आणि कोरोन्योद्धा तसाच इतरांचा सत्कार करण्यात आला. डिजिटल वधु वर मेळावा यासाठी घोषवाक्य स्लोगन व बोधवाक्यचे मानकरी प्रथम तीन पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई परिसरातील बडगुजर समाज बांधव सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार तसेच जेष्ठ नागरिकांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला व आपल्या महत्त्वाच्या समाज गुणगौरव पुरस्कारला सुरुवात झाली. ह्यावर्षी उत्कर्ष मंडळाच्या कार्यकारणी मंडळाने सामाजिक संस्था आणि कुटुंब वत्सल्य असे दोन विशेष पुरस्काराची नव्याने देऊन समाजाला नवीन दिशा दिली.

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, ठाणे, बृहन्मुंबई, कोकण परिसर. संचालित पाक्षिक बडगुजर दर्शन 2021 पुरस्काराचे सन्मानार्थी खालील प्रमाणे :

1. गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार
1.1 इ.10वी. (गुण 98.20%) – कु. साक्षी साहेबराव बडगुजर सकाळी, यावल. 1.2 इ.12 वी. (गुण 96.16%) कु.प्रफुल्ल सुदाम बडगुजर जळगांव.

2. समाज शेती मित्र गौरव पुरस्कार:- श्री. श्रावण रामचंद्र बडगुजर लोहारी,

3. समाज उद्योग रत्न गौरव पुरस्कार: श्री. सुनील बाबुलाल बडगुजर कुर्ला MDRT एजेंट.

4. समाज महिला भूषण गौरव पुरस्कार:- सौ.ज्योती ज्ञानेश्वर मोरडिया मुख्यध्यापिका जि. प. शाळा चवरे तालुका कल्याण,

5. समाज भूषण गौरव पुरस्कारश्री.बाळकृष्ण जगन्नाथ कोतवाल सुरत (गुजरात).,

6. समाज सेवक गौरव पुरस्कार :- श्री. अनिल सुपडू बडगुजर खेतिया (म. प्र.),

7. समाज कला /क्रीडा, साहित्य गौरव पुरस्कार :- कु. सायली किरण बडगुजर जळगाव.
8. समाज जीवन गौरव पुरस्कार:-जेष्ठ समाज सेवक, कै.नत्थू (अण्णा)नामदेव बडगुजर बोराडी,

9. विशेष पुरस्कार

9.1 समाज संस्था सेवा गौरव विशेष पुरस्कार
9.1.1 बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगाव विशेष गौरव पुरस्कार संयुक्तसेवा कार्यकारणी,
9.1.2 क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था,धुळे

9.2 कुटुंब वत्सल्य (संयुक्त कुटुंब प्रमुख) विशेष गौरव पुरस्कार: श्री. गोपाळ भाईदास बडगुजर सुरत (गुजरात)

या सर्वांना मंडळातर्फे बक्षिसे देऊन शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. उमेश लक्ष्मण बडगुजर (सर) यांनी केले. त्यांना मोलाचे सहकार्य श्री. सी. पी. बडगुजर सर प्राध्यापिका सौ. राजश्री भिलमाळ व प्राध्यापक शीतलप्रसाद बडगुजर यांनी केले.

दिवाळी अंक प्रकाशन सोहळा कार्यक्रमास उपस्थित समाज बंधू आणि भगिनीं यांचे आभार उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र धनजी बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा समाज बांधवांच्या मुखोद्वार निघत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन खूप सुंदर केलेले होते.

3 Comments

  1. बडगुजर उत्कर्ष मंडळ व पाक्षिक बडगुजर दर्शन आयोजित
    गुणगौरव व दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा अप्रतिम
    नियोजनबद्घ सर्वच events उत्कृष्ट समाजासाठी सर्वांनीच केलेलं तन मन धनाने केलेलं योगदान अभिनंदनीय सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार!!!!

  2. खूपच छान कार्यक्रम
    मुंबई उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारीनी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व यापुढेही आपणाकडून असेच भरीव कार्य होत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना .

  3. खूप छान. प्रोग्राम संपन्न झाला परंतु अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती कार्यकारिणी मध्ये आंतरिक मतभेद समाज विकास कसा होणार म्हणून संघटन आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*