||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
रणरणत्या उन्हात पोळणाऱ्या भर उन्हात पर्जन्याच्या सरी कोसळल्यास तिथल्या मृत्तिकेतून जसं जीवन फुलतं, बहरतं, तसंच “कलेचं आणि कलाकारांचं” असणं मानवी जीवनातल्या शीण घालवून आंनद पेरतं. मायानगरी आणि रंगभूमीच्या आभाळात आपली चमक सिद्ध करून पाहणारा हर हुन्नरी नायक कर्मी श्री.गणेश बडगुजर नामक तरुण असाच एक धपडणारा नटाचे कार्य बघून समाजाचं शीर अभिमानानं उंचवाव तसं तो समाजातील नटउचवणाजोग काम करतोय.
बाळापूर (फागणे) जि. धुळे इथली पाळमूळ असणारे श्री. गणेश सुरेश बडगुजर यांना नुकतंच अभिनयाच्या माध्यमातून दिलेल्या कला क्षेत्रातील भरभक्कम योगदाना बद्दल पुणे येथील आर्ट बीट्स फाउंडेशन कडून “महाराष्ट्र कला सन्मान २०२१” पुरस्काराने गौरविण्यात आलंय त्यांच्या या सन्मानाने संपूर्ण बडगुजर समाज बांधवाचा ऊर अभिमानानं भरून आलंय.
श्री. सुरेश कौतिक बडगुजर व सौ. इंदूबाई सुरेश बडगुजर या आपल्या आई वडिलांचं अनमोल मार्गदर्शन व भक्कम पाठींब्याच्या जोरावर श्री. गणेशने कला क्षेत्रातील वेगानं घोडदौड केली आहे. मराठी व हिंदी या दोन्ही भाषेतला पडदा व्यापून टाकणारी त्यांची कारकीर्द आहे. ख्यातनाम अभिनेते अरुण नलावडे सोबत सानेचं काही खरं नाही हे नाटक तसेच द न्यूज, गणपती बाप्पा मोरया, गुरू: साक्षात परब्रम्ह या सारखी मराठी नाटकं तसच लक्ष्य (स्टार प्रवाह), दुहेरी (स्टार प्रवाह), नांदा सौख्य भरे (झी मराठी), अस्मिता (झी मराठी), शौर्य (झी युवा) स्वराज्य रक्षक संभाजी ( झी मराठी), डॉ. भीमराव आंबेडकर ( स्टार प्रवाह), अग्निहोत्र -२ ( स्टार प्रवाह), स्वामींनी ( कलर्स मराठी), जिगरबाज ( सोनी मराठी, स्वराज्य जननी जिजामाता ( सोनी मराठी) यासारख्या ख्यातनाम मराठी मालिकांमधून तिचे शहर होणे हा मराठी चित्रपट, मेरे साई (सोनी टी व्ही) ही हिंदी मालिका आणि ‘ गर्ल इन द सिटी’ ही वेबसिरीज अभिनय क्षेत्रात अशी, सप्तरंगी, बहुआयामी मुशाफिरी त्यांनी केलीय, नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज अशा सर्व माध्यमातून ते आपलं स्थान अढळ करू पाहत आहेत. त्याचं काम हे वाखण्याजोगे आहे.
श्री. गणेश बडगुजर यांनी अभिनय क्षेत्रात नवनवीन उच्चांक गाठून आपलं कुटुंब आणि समाज दोहोंचं नांव उज्ज्वल करावं या साठी श्री चामुंडा माता त्यांना भरभरून आशिर्वाद देवो, अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा! व अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹
Leave a Reply