||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पुणे– येथील श्री कुणाल भानुदास बडगुजर, (चाळीसगाव) यांनी नुकतीच पुणे ते गोवा ही सायकल मोहीम यशस्वी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. श्री कुणाल बडगुजर व त्यांचा सायकल प्रेमी ग्रुप दिनांक 4 डिसेंबरला नांदेड सिटी पुणे येथून सायकल राईड करून गोवा ला रवाना झाला. सह्याद्रीच्या घाटातून प्रचंड चढण उतरण असलेले वळणा-वळणाचे अरुंद रस्ते, कधी कच्चा तर कधी समुद्र मार्गाचा रस्ता अशा प्रतिकूल मार्गाने सहाशे किलोमीटर अंतर सतत सहा दिवस सायकल चालवून दिनांक नऊ डिसेंबरला सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी त्यांनी गोवा गाठले व आपली मोहीम यशस्वी पूर्ण केली.
श्री कुणाल यांना सुरुवातीपासूनच शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची आवड आहे. विविध ठिकाणच्या मॅरेथॉन, स्विमींग सायकलिंग अशा अनेक स्पर्धा त्यांनी आजपर्यंत यशस्वी पूर्ण केलेल्या आहेत. आय. टी. सारख्या प्रचंड व्यस्त व ताणतणाव असलेल्या क्षेत्रात आपली नोकरी सांभाळून त्यांनी स्वतःसाठी वेळ देऊन अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला व यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाने तरुण वर्गाला नक्कीच एक चांगला संदेश मिळत आहे. तसेच समाजात व मित्रमंडळीत आपल्या मेहनत, चिकाटी व आत्मविश्वासाने एक आदर्श निर्माण केला आहे, त्याच बरोबर आपली सायकल मोहीम यशस्वी करताना पर्यावरणाचा एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे.त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.
श्री कुणाल हे चाळीसगाव येथील सेवानिवृत्त प्राध्यापक बी. जी. बडगुजर (माजी प्राचार्य) यांचे चिरंजीव व फैजपूर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर एन. एल. चव्हाण यांचे जावई आहेत. श्री कुणाल यांच्या यशाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 व अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 🌹🌹
श्री. बी. जी. बडगुजर – 9423902098


Congratulations and best wishes for your future career.
खूप अभिमान वाटतो कुणालपंत
अभिनंदन !!!