मुंबई विभागातील सामजिक कार्यकर्ते श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर यांना लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद तर्फे मानाचा सन्मान – राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्कार जाहीर

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद, मुंबई च्या ३ रा वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने विविध प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सामाजिक क्षेत्रातील अनमोल योगदानाची विशेष कामगिरी बद्दल या संस्थेतर्फे अत्यंत मानाचा असा राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्कार जाहीर करण्यात आले.

यामध्ये आपल्या समाजातील मुंबई विभागातील कार्यतत्पर व समाजाभिमुख कामगिरी करणारे तसेच अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे माजी उपाध्यक्ष, बडगुजर समाज ऊत्कर्ष मंडळ, मुंबई चे माजी अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके असे श्री. भगवानशेठ लक्ष्मणशेठ बडगुजर यांची निवड करण्यात आली आहे. श्री. भगवान शेठ हे समाजात विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात.

श्री. भगवान लक्ष्मण शेठ बडगुजर

तरी सदर पुरस्कार सोहळा हा शनिवार दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता साहित्य मंदिर (A/C Auditorium), सेक्टर – ६, एम.जी.एम. हॉस्पिटल जवळ, वाशी, नवी मुंबई – ४००७०३ या ठिकाणी होणार आहे.

श्री. भगवान शेठ यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्यावर सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आम्ही बडगुजर.इन टिम व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे आपणांस मनापासून शुभेच्छा देतो तसेच आपले कार्यसातत्य व अतुलनीय कामगिरी अधिकाधिक वृध्दींगत होवो, हीच सदिच्छा.

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*