बडगुजर समाज उन्नती मंडळ व महिला उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद – श्री. धिरज बडगुजर सर सोनशेलू

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी नंदुरबार येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ व बडगुजर समाज महिला उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पंचवीस ते तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी सिव्हिल हॉस्पिटल येथील कोरोना काळात रुग्णांसाठी जीवाची बाजी लावून मदत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला.

प्रथम चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.विजय बडगुजर, उपाध्यक्ष श्री.रवींद्र बडगुजर, सचिव श्री.अश्विन बडगुजर, सह सचिव श्री.दिनेश बडगुजर, खजिनदार श्री.देविदास बडगुजर, माजी नगरसेवक माजी अध्यक्ष श्री. दिलीप बडगुजर, सल्लागार श्री.पंडित बडगुजर, सदस्य श्री.गणेश बडगुजर, श्री.भरत कोतवाल, श्री. विलास बडगुजर, श्री. प्रकाश बडगुजर, महिला मंडळ अध्यक्ष सौ.सुनिता बडगुजर, उपाध्यक्ष सौ. पौर्णिमा बडगुजर, सचिव सौ.रेणुका बडगुजर , सौ.सदस्य अनिता बडगुजर व इतर समाज बांधव उपस्थित होते तसेच डॉक्टर सौ. खताळे जयेश सोनवणे, महेंद्र चव्हाण, रोहित चव्हाण, ईश्वर वसावे, अहमद पिंजारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

2 Comments

  1. बडगुजर समाज नंदुरबार बंधू भगिनींचा उत्तम उपक्रम!
    अभिनंदन!
    शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published.


*