||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
परमशांती वृद्धाश्रमात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षा पासून कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नसल्यामुळे सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन ऐरोली व स्वरांजली आर्केस्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८/११/२१ रोजी परमशांतीधाम वृध्दाश्रम तळोजा येथील वृद्धांच्या मनोरंजनासाठी सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात चंद्रकांत बडगुजर सर व कन्हू परमार यांनी किशोर कुमार , मोहम्मद रफी यांच्या आवाजातील अजरामर अशी हिंदी गाणी सादर करून वृध्दाश्रमातील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.तसेच जूनी,नवी मराठी हिंदी गाणी सादर करून वृध्दाश्रमातील आबालवृद्धांचा चेहरा आनंदाने खुलवीला. कन्हू परमार यांनी गायलेल्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर आश्रमातील वृध्दानी व संस्थेच्या जेष्ठ सभासदांनी नाच करुन मनमुराद आनंद लुटला.
सदर मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेने सभासदांची एक दिवसांची सहल आयोजित केली होती. त्यामध्ये सकाळी महड येथील गणपतीचे दर्शन घेऊन खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट देऊन दर्शन घेतले.तसेच तेथील परिसरात फिरुन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला.
त्यानंतर दुपारी ४ वाजता परमशांतीधाम वृध्दाश्रमास भेट देऊन मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे वेळी संस्थेच्या सभासदांनी व शुभचिंतकांनी जमा केलेल्या ३२ हजार रुपयांचे अन्न धान्य संस्थेचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांच्या हस्ते आश्रमाला भेट देण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भारत म्हात्रे, सचिव संजय जाधव व सभासद तसेच परमशांतीधाम वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक अभय वाघ व आश्रमातील सर्व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुगम संगीताच्या मैफिलींमध्ये सामील होऊन मनसोक्त आनंद घेतला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सभासद किसन चित्ते, शिवराम भोसले, धनाजी भोसले, हरीचंद्र डाके यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांनी प्रास्ताविक करून केली तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव संजय जाधव यांनी केले.
Leave a Reply