पिंपळगांव हरेश्वर : नुकतेच पिंपळगाव हरेश्वर येथे परिवारासोबत आलेल्या सुरत येथील सौ. हेमलता ताई व श्री. गोपाल भाईदासशेठ बडगुजर, अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट, सुरत चे माजी अध्यक्ष यांनी पिंपळगांवात बांधकाम सुरू असलेल्या चामुंडा माता मंदीरास सहपरिवार भेट दिली. मंदीराचे सुरू असलेले काम पाहून श्री. गोपाल भाईदास बडगुजर व त्यांचे मित्र श्री. राजू भाई पानेलिया यांना आनंद वाटला व सुरू असलेल्या कामाचे त्यांनी भरून कौतुक ही केले. व त्यांनी स्वेच्छेने मंदीराच्या उर्वरित कामात तनमनधनाने मदत करण्याचे समस्त पिंपळगांव हरेश्वर येथील समाजबांधवांकडे आश्वासन दिले. त्यांनी अचानक चामुंडा माता मंदीरास दिलेल्या या भेटीमुळे पिंपळगांव वासियांना एक अनमोल भेट मिळाली. तसेच पिंपळगांव येथील समाज बांधवांनी श्री. गोपालशेठ बडगुजर यांचा सहपरिवार यथोचित सत्कार केला. तसेच त्यांचे मित्र सुरत येथील नामवंत उद्योजक राजू भाई पानेलिया हे उपस्थित होते. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून
पुणे येथील उद्योजक श्री.भगवान दत्तात्रयशेठ बडगुजर, उपाध्यक्ष, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे, श्री. संतोषजी कांचन, पुणे हवेली तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस, पुणे, श्री. दिवाकर विश्ववनाथ शेठ बडगुजर, अध्यक्ष, पिंपळगाव हरेश्वर बडगुजर समाज, श्री. दत्तात्रय पुनाशेठ बडगुजर, श्री. मनोज गंगाधर शेठ बडगुजर सर, श्री. प्रदीप वामनशेठ बडगुजर (पवार), श्री. रविंद्र नारायण शेठ बडगुजर, सौ. रंजिताताई मनोजशेठ बडगुजर, सौ. कुसुमताई प्रदीप बडगुजर, सौ. यशोदाताई भागवत शेठ बडगुजर हे उपस्थित होते.
Leave a Reply