||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
राजकोट मुकबधीर मंडळ व्दारे आयोजित T-20 क्रिकेट टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. यात गुजरात राज्यातील विविध ठिकाणच्या टिम यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुरत टिम मध्ये आपल्या समाजातील उभरता सितार चि. विशाल सुभाष बडगुजर याची सुरत टिम मध्ये निवड करण्यात आली होती. चि. विशाल याने या सामन्यात विशेष कामगिरी करत सुरत टिमला जिंकविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
या स्पर्धेचा अंतिम सामना हा अहमदाबाद व सुरत यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करत अहमदाबाद टिमने १७ ओव्हर मध्ये सर्व बाद १०१ धावा केल्या. सुरत टिमला जिंकण्यासाठी २० ओव्हर मध्ये १०२ धावांचे आव्हान होते ते त्यांनी १५.४ ओव्हर मध्येच पुर्ण करत विजय प्राप्त केला. या रंगतदार लढतीत चि. विशाल याने विशेष कामगिरी करत संघाला या स्पर्धेत जिंकविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
चि. विशालचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बडगुजर युवा संघटन, सुरत, बडगुजर.इन टिम बडगुजर, प्राऊड ग्रुप, अखिल भारतीय युवक समिती, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 तर्फे चि. विशालचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
विशाल सुरेश बडगुजर याने क्रिकेट मध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल करोडपती परिवार उल्हासनगर तर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन