||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सत्कार सोहळा दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने धुळे पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार म्हणून प्राचार्य ईश्वर बडगुजर मुकटी यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
प्रा. ईश्वर बडगुजर सर हे बडगुजर समाजदूत या प्रसिद्ध साप्ताहिक याचे संपादक आहेत. समाजाचे एक विश्वसनीय प्रसार माध्यमापैकी एक असे हे साप्ताहिक आहे. प्रा. ईश्वर सर यांची लिखाण शैली व योग्य विषयाला समाजासमोर मांडण्याची प्रगल्भ शब्दशैली हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लिखाणामुळे अनेक परिवर्तन समाजात घडलेले आहेत.
धुळे जिल्हा परिषद बालकल्याण व महिला विकास सभापती सौ. धरती देवरे व धुळे जिल्हा झी२४ तास चे प्रतिनिधी श्री. प्रशांत परदेशी यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. रोहिदास हाके, ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे, सौ. जयश्री ईश्वर बडगुजर ,आप्पा खताळ, प्राचार्य नानादेवरे, भास्कर माळी, उमाकांत पाटील, गोकुळ राजपूत सह पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. प्राचार्य ईश्वर बडगुजर यांना मिळालेल्या पत्रकार संघाच्या पुरस्काराबद्दल श्री राजेंद्र बडगुजर कुसुंबा, श्री मनोहर बडगुजर धुळे ,अशोक बडगुजर धुळे, सौ.सारिका महेंद्र पवार, अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 तर्फे आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
Leave a Reply