||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
!! अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
पारोळा, बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्था इ.सन १९५१ साली स्थापना झाली असून तेव्हा पासून ते आज पर्यंत दर तीन वर्षांनी संस्थेची कार्यकारिणी निवडली जात असते. ह्या वर्षी देखील संस्थेची कार्यकारिणी निवड प्रक्रिये मध्ये बडगुजर समाजातील दोन बडगुजर समाज बांधवांची संचालक पदी निवड करण्यात आली आहेत. प्रा.श्री.विठ्ठल श्रीराम बडगुजर व श्री. सुधाकर अर्जुन बडगुजर ह्यांची संचालक म्हणून निवड झाली या वरुन असे निदर्शनास येते आहे की, बहादरपूर येथील बडगुजर समाजाची एकता व संघटीतपणा, चिकाटी आणि प्रयत्न केल्यामुळे दर तीन वर्षांतून बडगुजर समाजातील दोन तीन पदे ही ठरलेली आहेत.
या यशा मागे “एकच ध्यास संस्थेचा सर्वांगीण विकास” हेच हित जोपासले जात आहे. त्यामुळे कदाचित बडगुजर समाज बांधव संचालक पदी निवडून येत आहेत.
समाजातील वडिलधारी मंडळी व समाज बांधव यांच्या एकजुटीचे हे दर्शन घडत असते त्यामुळे दर तीन वर्षांतून नूतन शिक्षण संस्थे मध्ये किमान दोन बडगुजर समाज बांधवांची संचालक पदी निवड झालेली पाहायला मिळत आहे. हे समाजासाठी अभिमानास्पद असून बहादरपूर बडगुजर समाज बांधव व अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन! व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा! 🌹🌹
प्रा.श्री.विठ्ठल श्रीराम बडगुजर
श्री. सुधाकर अर्जुन बडगुजर
Abhinandan