बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. बापूराव किसन शेठ बडगुजर यांचे लोहारी बु।।. समाज बांधवांन कडून यथोचित सत्कार

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष, श्री. बापूराव किसन बडगुजर यांचे लोहारी बु.।।. येथील
चामुंडा माता युवा संघटना, लोहरी बु.।।.ता.पाचोरा, यांचे कडून सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ करतांना, जेष्ठ समाजसेवक श्रीयुत श्रावण रामचंद्र बडगुजर, ग्रामपंचायत माजी सरपंच श्रीयुत चिंधू नाना बडगुजर, श्रीयुत नरेंद्र बडगुजर, श्री.अनंत रुपचंद बडगुजर, श्री.लक्ष्मण बाबुलाल बडगुजर, श्री.समाधान बडगुजर आणि मंडळाचे कार्यकारणी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळी इत्यादींनी मन: पूर्वक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष, श्री. बापूराव किसन बडगुजर यांनी लोहारी बु.।।. येथील चामुंडा माता युवा संघटना, बडगुजर समाज, ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले की, आपण सर्व खानदेश वासियांनी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळास सहकार्य करावे अशी विनंती केली.चामुंडा माता युवा संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी श्री. बापूराव बडगुजर यांना आश्वासन दिले की भविष्यात कधीही काही ही काम सांगा आंम्ही आमची पूर्ण टीम आपल्या पाठीशी आहोत. माता चामुंडेच्या कृपेने आपल्या हातून बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे कामे आणि मुंबई परिसरातील समाज संघटन जास्तीत जास्त मजबूत होवो व आपल्या नावाचा नावलौकिक होवो अशी आम्ही चामुंडा माता युवा संघटना, लोहरी बु.।।.बडगुजर
समाज, ग्रामस्थ माता चामुंडाच्या चरणी प्रार्थना करतो.

श्री. बापू किसन बडगुजर यांचा सत्कार करतांना लोहारी येथील समाजबांधव

1 Comment

  1. लोहारी कर योग्य बांधवा कड़ून योग्य सत्कार, आशा मूले सत्कार मूर्तिची प्रतिमा ही ऊँच होते

Leave a Reply

Your email address will not be published.


*