नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ , महिला मंडळ व आई चामुंडा फाऊंडेशनच्या सोबतीने गरिबांची दिवाळी साजरी. — लोकेश कोतवाल

नंदुरबार येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ , महिला मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब जनतेला फराळ , मिठाई व फटाके वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सुमारे 70 कुटुंबांना फराळ , मिठाई व फटाक्यांचे किट वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.

दिवाळी सण म्हटला की सर्वत्र आनंद व उत्साह दिसून येतो. सर्वत्र रोषणाई, नवीन कपडे, फराळ, मिठाई व फटाके खरेदीचा उत्साह दिसून येतो . परंतु हा आनंद फक्त श्रीमंतांच्या नशिबी असतो. सामान्य, गरीब व गरजू लोकांना पाहिजे तसा आनंद घेता येत नाही, याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ, महिला मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोर गरिबांची दिवाळी साजरी करण्याचे ठरविण्यात आले त्याअनुषंगाने महिला मंडळा तील सदस्य व बडगुजर समाज उन्नती मंडळातील सदस्य, अध्यक्ष यांची मिटिंग घेऊन गरिबांची दिवाळी साजरी करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने शहरातील करण चौफुली येथील झोपडीत राहणार्‍या कुटुंबांना फराळ, मिठाई व फटाक्यांचे किट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचे कार्य बडगुजर समाज उन्नती मंडळ, महिला मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन यांनी केले.

यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुनीता मनोज बडगुजर, सचिव सौ रेणुका शरद बडगुजर, उपाध्यक्ष सौ पौर्णिमा अनिल बडगुजर, सदस्य सौ प्रीती गिरीश बडगुजर, वैशाली कैलास बडगुजर, अनिता विजय बडगुजर तसेच बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर, माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप राघो बडगुजर, मंडळाचे सल्लागार पंडित बडगुजर, सदस्य विजय कुमार जगन्नाथ बडगुजर, गणेश बडगुजर , कैलास बडगुजर आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*