दिवाळी संध्या कार्यक्रमाने फुलला ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद – चि. राहुल सुरेश बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

सिनीअर सिटीझन हेल्थ केअर फाऊंडेशनच्या दिवाळी संध्या कार्यक्रमाने फुलला ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद
दिवाळी सणाचे औचित्य साधून सिनीअर सिटीझन हेल्थ केअर फाऊंडेशन, ऐरोली या संस्थेने बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ऐरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर सभागृह, सेक्टर ४ ऐरोली येथे, स्वरांजली ग्रुप ऑफ ऑर्केस्ट्रा च्या सहकार्याने मराठी आणि हिंदी गीताचा कार्यक्रम आयोजित करून जेष्ठ नागरिकांचां आनंद द्विगुणित करून आगळी वेगळी दिवाळी भेट दिली.
संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते दीप्रज्वलन करून, कार्यक्रमास सुरुवात झाली. तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनराव पाटणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना,“ज्येष्ठ नागरिक दीर्घ काळ घरात बसून असल्याने त्यांना एनर्जीचा बुस्टर डोस देणे आवश्यक वाटल्याने” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ही बुस्टर मात्र ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी खात्री असल्याचे नमूद केले व थोडक्यात संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
स्वरांजली ग्रुप ऑफ ऑर्केस्ट्राचे श्री.चंद्रकांत बडगुजर यांचे उत्कृष्ट संयोजन, सौ.छाया सपकाळ, श्री.कन्नूर परमार यांचे सुमधुर गायन व त्यास महेश जेना यांचे सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन लाभल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.यावेळी श्री. चंद्रकांत बडगुजर यांनी जे गीत सादर केले त्यामुळे सर्व श्रोते गण ही मंत्रमुग्ध व भारावुन गेले. यावेळी संस्थेच्या सभासदांनी देखील आपली कला सादर केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.भारत म्हात्रे, शिवराम भोसले, विश्वास मोहिते, किसन चित्ते, धनाजी भोसले, विजय जेना यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार श्री.शांताराम विशे यांनी केले तर संस्थेचे सहसचिव श्री.महादेव इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

1 Comment

  1. Very good Organization For Retiers,Shri.Chandrakant Badgujar Sir💐🎉👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*