सौ. प्रियंका बडगुजर यांनी पोस्टर स्पर्धेत पटकवला प्रथम क्रमांक – श्री. सुनिल बडगुजर औरंगाबाद

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||


डोके आहे सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक.

औरंगाबाद येथील श्री.सुरेश खंडुशेठ बडगुजर यांच्या सुनबाई, चोपडा येथील श्री.संजय बळीरामशेठ बडगुजर यांची मुलगी व श्री. हर्षल सुरेशशेठ बडगुजर यांच्या सौभाग्यवती सौ. प्रियंका बडगुजर यांची महाराष्ट्रभर व समाजात वाह! वाह! होत आहे. सिंगापूर येथील आयोजित मॉर्गन इंडिया प्रा. लि. कंपनी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सौ. प्रियंका हर्षल बडगुजर यांनी प्रथम क्रमांक चे नामांकन मिळविले व त्यांनी रोड सेफ्टी या विषयावर पोस्टर तयार केले व हेल्मेट घातल्याने काय लाभ होतो. याविषयी जनजागृती संदेश दिला आहे.

त्यांचे हे पोस्टर सिंगापूर येथे नागरिकांच्या जनजागृती साठी वापरण्यात येत आहे. या यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अखिल भारतीय युवक समिती. प्राऊ ड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, व 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

2 Comments

  1. मान्यवर सौ प्रियंका ताईंचे अभिनंदन!
    आवश्यक जनजागृती केली.

Leave a Reply

Your email address will not be published.


*