अंमळनेर – येथील बडगुजर समाज मंगल कार्यालयात दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी रविवारी झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारणीच्या सभेत अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या अध्यक्ष पदी धुळे बोर्डिंगचे अध्यक्ष आनंदा धोंडू सूर्यवंशी यांची तसेच नियोजित अध्यक्ष म्हणून भुसावळचे श्री. सुरेश शिवराम महाले व पनवेल येथील श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महासमितीच्या उपाध्यक्ष पदी श्री. दिलीप राघो बडगुजर, सचिव पदी प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर, सहसचिव पदी श्री. भालचंद्र विठ्ठल साळुंखे, खजिनदार पदी श्री. प्रकाश धुडकु बडगुजर व संघटक पदी श्री. सुधीर तुळशीराम बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे मावळते अध्यक्ष माधवराव जानकीराम बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर नूतन अध्यक्ष आनंदा धोंडू सूर्यवंशी, माजी अध्यक्ष उमेश हिरालाल करोडपती, मावळते उपाध्यक्ष भगवान लक्ष्मण बडगुजर, मावळते सचिव राजेंद्र भालचंद्र बडगुजर, अधीक्षक मनोहर बंसीलाल बडगुजर, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सुरेखाताई बडगुजर व माजी नगरसेविका सुनंदाताई बडगुजर उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला पंचायत समिती सदस्या सुरेखाताई बडगुजर यांचा त्यांच्या कुटुंबासह सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीने बडगुजर समाजाच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
समाजाच्या दृष्टीने आनंदाची, प्रेरणादायी आणि दिशादर्शक बाब म्हणजे चोपडा येथील रवींद्र पंडित बडगुजर यांच्या स्नुषा सौ. स्नेहल अभिषेक बडगुजर यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून त्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि डेप्युटी सी.ई.ओ. वर्ग – १ पदी त्यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सभेचे आयोजन करणाऱ्या अमळनेर येथील बडगुजर समाज मंगल कार्यालयाच्या वतीने राजाराम सोनू बडगुजर, बापूशेठ बडगुजर आणि सदस्यांकडून नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर अजेंड्यानुसार कामकाज झाले. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून ते कायम करण्यात आले. आज अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. महासमितीची आजीवन सभासद वर्गणी भरलेल्या नवीन सभासदांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतरचा विषय अध्यक्ष व पदाधिकारी निवडीबाबत बाबतचा होता.
या सभेत माधराव जानकीराम बडगुजर, उमेश हिरालाल करोडपती, आनंदा धोंडू सूर्यवंशी, भगवान लक्ष्मण बडगुजर, राजेंद्र भालचंद्र बडगुजर, सुरेश शिवराम महाले, सुधीर तुळशीराम बडगुजर, राजेंद्र दिगंबर नंदवाळकर, प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर, प्राचार्य ईश्वर हरचंद बडगुजर, दिलीप राघो बडगुजर, पंढरीनाथ राजाराम बडगुजर, लिलाधर दत्तात्रय बडगुजर, श्रीराम जानकीराम बडगुजर, राजेंद्र दत्तात्रय पवार, निलेश शरद बडगुजर, रविंद्र पंडित बडगुजर, लोकेश रविंद्र कोतवाल, धर्मेन्द्र पोपट बडगुजर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आयोजकांसह सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानण्यात येऊन नवनिर्वाचित पदाधिकारीचे अभिनंदन करण्यात आले व खेळीमेळीच्या वातावरणात सभेचा समारोप झाला.
महासमितीचे नूतन अध्यक्ष व नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
💐💐💐
महासमितीच्या अध्यक्ष, व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी समाजातील रंजले गांजले व गुणवंत, होतकरू यांच्या साठी भरीव कार्य करावे हिच अपेक्षा. त्यांचा मार्गदर्शनाखाली समाज अधिकाधिक समृद्ध व प्रगत होईल हीच सदिच्छा. 🌺🌺🌺
स्नेहल मॅडम,
सर्व प्रथम MPSC परिक्षेत यशस्वी झाल्या बद्दल तुमचे अभिनंदन.तसेच डेप्युटी CEO class 1 पदी निवड झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन. बडगुजर समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक प्रेरणा स्थान आहेत. समस्त बडगुजर समाजासाठी तुमचे कर्तृत्व अभिमानास्पद आहे.बडगुजर समाज बांधवांच्या कामाला नेहमीच प्राधान्य देत जा हिच आपणास विनंती.
🙏🙏,
नव निर्वाचित सदस्यांचे अभिनंदन..!
सहभागि व उपस्थीत समाजबांधवांचे तसेच आयोजन टीमचे आभार..
पुढील समाजकार्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छां:-
श्री नरेंद्र सिताराम बडगुजर व परिवार,🙏🙏
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
समाज कल्याण कार्य प्रगती पथावर जाऊद्या.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे नवनिर्वाचित
अध्यक्ष मा . श्री आनंदा भाऊ बडगुजर , नियोजित . अध्यक्ष मा .. श्री सुरेश महाले , नियोजित अध्यक्ष श्री भगवान लक्ष्मण बडगुजर , उपाध्यक्ष श्री . दिलीप भाऊ राघो बडगुजर सचिव प्रा . श्री . हिरालाल रघुनाथ बडगुजर , सहसचिव श्री भालचंद्र विठ्ठल साळुंके , खजिनदार श्री प्रकाश धुडकू बडगुजर व सर्व नवनिर्वाचीत
कार्यकारीणी सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन ,भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
संघटकपदी श्री सुधीर भाऊ यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
या नंतर च्या पुढ़ील पांच वर्षाचे ही नियोजित अध्यक्ष करुन आ भा ची पांचाली क़रने योग्य रहिले असत असे वाटते