||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
धरणगांवला दिहीचा परिवारात सालाबादप्रमाणे सलग ३४ व्या वर्षी नवरात्रोस्तव व देवीचे थाट(चक्रपूजा) उत्साहात साजरा झाले. सन १९८८ पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सन १९८८ पासून हा कार्यक्रम श्री. मनोहर गंगारामशेठ बडगुजर यांच्या घरी कुलदैवत आई चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून घटस्थापना केली जाते. दिहीचा परिवाराने सलग ३४ व्या हा कार्यक्रम घेऊन उज्वल परंपरा कायम ठेवली.
घटस्थापना च्या दिवशी आई चामुंडा मातेचे प्रतिमेचे पूजन करून नवरात्रोस्तवाला सुरुवात होते. नवरात्रीत दररोज सकाळ व संध्याकाळी दिहीचा परिवारातील प्रत्येक दांपत्याला आरतीचा मान दिला जातो. धरणगावला दिहीचा परीवारातील सर्व युवक व माता बघिणी रात्री गरबा खेळण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
शेवटी अष्टमीला देवीचे थाट(चक्रपूजा) व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. समजा जर दिहीचा परिवारातील एखादे कुटुंब थाट करायला इच्छूक असेल तर ते करू शकतात. तेव्हा ते कुटुंब स्वखर्चाने देवीचे थाट करते. तसेच यावर्षी श्री.धनलाल दौलतशेठ बडगुजर यांनी स्वखर्चाने देवीचे थाट केले. अष्टमीच्या दिवशी चक्रपूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. चक्रपूजा व महाप्रसादासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी दिहीचा परिवारातील प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य उपस्थित असतो.
धरणगाव दिहीचा परिवारात सुमारे ६० घर आहेत तरी सुमारे ४०० ते ५०० लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.
महाप्रसादासात पुरणपोळी,खीर(साखर), चणे, फुनके(मनुका) इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. अष्टमीच्या दिवशी दिहीचा परिवारातील माता बघिणी चुल्ह्यावर खापर ठेवून पुरणपोळी बनवतात. महाप्रसादासाठी पदार्थ चुल्ह्यावर बनवले जातात व त्यासाठी सर्पण म्हणून फक्त आंब्याच्या लाकडांचा वापर केला जातो. अष्टमीच्या दिवशी देवीच्या समोर ८१ पुरणपोळी, ८१ फुनके(मनुका), चणे, खीर(साखर) असा नैवद्य दिला जातो. चक्रापूजेवर ९ लहान दिवे लावले जातात व १ मोठा दिवा लावला जातो. दसऱ्याच्या दिवशी विसर्जन पूजा केली जाते.
दिहीचा परिवारातील सर्व सदस्य व इतर व्यक्तींच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी होण्याचे श्रेय हे ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले त्यांना जाते.
✍️ रोहित बडगुजर
धरणगांव
9765627875
Sow good