||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अहमदाबाद गुजरात येथील कै. नामदेव पानाचंद बडगुजर यांचे सुपुत्र श्री. राजेश नामदेव बडगुजर व त्यांची सुन सौ.प्रतिभा राजेश बडगुजर यांचे लहान सुपुत्र चि. तुषार राजेश बडगुजर यांचे नुकतेच UK लंडन येथे उच्च शिक्षाना साठी दिनांक २९ सप्टेंबर रोजी प्रस्थान केले.
अगदी गरीबीची, आर्थिक परिस्थिती वर मात करत व स्वतः लॉरी चालवून कुटुबाचे पालन पोषण करुन मुलाला डिग्री पर्यतचे शिक्षण अहमदाबाद ला येथे पुर्ण केले. चि.तुषार हा उच्च शिक्षणासाठी सात समुद्र पार जाणार ही बाब कुटुंबा साठी व आई वडिलांचे नांवलौकिक करण्यासाठी अति शोभनीय,गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
बडगुजर समाजासाठी ही मोठी कौतुकास्पद व अभीमानास्पद गोष्ट आहे. शिवाय कोरोना काळात आपण पाहिले की पूर्ण जग हे लॉक डाउन होते. या काळात सर्व जण घरीच होते व सर्व प्रकारे सरकाच्या नियमाप्रमाणे उद्योग धंदे ही बंद होते त्यामुळे लॉरी देखील बंद होते व यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे खूप कठीण जात होते पण यासाठी एकच पर्याय होता तो म्हणजे पैसे हे व्याज रूपाने घेणे. व पैसे हे हप्त्याने देता येईल.
खरोखर धन्य आहे श्री. राजेश नामदेव यांच्या साहसी वृत्तिला समाजा साठी ते प्रेरणादायी ठरतील यात मात्र दुमत नाही.
चि. तुषार यांना अनेक अनेक आशीर्वाद,शुभेच्छा, परम् कृपालु ईश्वरास विनम्र प्रार्थना की उच्च शिक्षणास त्यांना खुप यश मिळो व आई वडीलांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न यशस्वी होवो हीपूर्ण होवो.
श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष व सचिव, अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
* * श्री. तुषार राजेश बडगुजर ( अहमदाबाद )
यांचे व परिवाराचे ,
* हार्दिक अभिनंदन !
* चिं. तुषार यास हार्दिक शुभेच्छा !
Congratulations to Tusharkumar& Parents Proud of your Hard Work💐💐🎉🎉👌👍
Congratulations Tushar and all the best for your future