चि. निलांश वय २ वर्ष याच्या अतुलनीय कामगिरी बद्दल “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” या प्रतिष्ठित रेकॉर्ड चा मानकरी व चि. दुर्विल याची कौतुकास्पद कामगिरी – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

जळगाव, ह.मु.पुणे येथील सौ स्नेहल दिपक बडगुजर (M.A.B.Ed) शिक्षिका व श्री. दिपक हेमचंद्र बडगुजर (B.E.Mech) हेड ऑफ परचेस असून यांचे द्वितीय (अनुज) अपत्य चि. निलांश दिपक स्नेहल बडगुजर वय २ वर्ष २ महिने या कोवळ्या वयात अप्रतिम बुद्धिमत्तेच्या जोरावर ” इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” या रेकॉर्ड चा मानकरी ठरला आहे.


इतक्या कमी वयात चि. निलांश हा A To Z कॅपिटल व स्मॉल अल्फाबेट ओळखून क्रमाने लावणे तसेच लिहिणे, 1To 10 नंबर अधून मधून तसेच क्रमाने ओळखून सांगणे,वाहतुकीची साधने ,निरनिराळे रंग ,फळांची फुलांची पक्षांची नावे , पाण्यातील जमिनीवरील प्राण्यांची नावे ,आकार ,प्राण्यांच्या घरांची नावे ,प्राण्याच्या पिल्लांची नावे, प्राण्यांचे आवाज ,चित्र काढणे ,आठवड्याचे वार,बोटांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये अगदी अचूक ओळखतो त्याबद्दल त्याला “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” तर्फे प्रशस्तीपत्रक,गोल्ड मेडल तसेच पेन व आयडी कार्ड ही भेटले आहे. या उपक्रमात चि. निलांश यास त्याचा मोठा भाऊ चि. दुर्विल आई सौ स्नेहल व वडील श्री दिपक बडगुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
चि. निलांश हा जळगाव येथील सौ जिजाबाई व श्री हेमचंद्र बडगुजर तसेच वसई येथील सौ प्रतिभा व अरुण कोतवाल यांचा नातू आहे.
चि. निलांश चा अग्रज चि. दुर्विल (वय १२) ह देखील खूप हरहुन्नरी असून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने भाग घेऊन मेडल पटकावतो. कराटे मध्ये त्याने गोल्ड, सिल्वर,ब्राँझ अशी मेडल मिळवून अलौकिक कामगिरी केलेली आहे.तो सर्टिफाईड कोडर सुद्धा आहे. दुर्विल च्या वेगवेगळ्या ॲक्टिविटी तुम्ही “My Art माझी कला स्नेहदिप “ ह्या यूट्यूब चॅनेल वर पाहू शकता.

https://youtube.com/channel/UC9i5fUrAhqlTOi8GfwESA3A

चि. निलांश व चि. दुर्विल भांवडे


निलांश व दुर्विल यांचे वसई येथील सौ कलावती व श्री एकनाथ गंगाराम बडगुजर (पणजी,पणजोबा) सौ रंजना व श्री दिपक बडगुजर (मामी आजी,मामा बाबा) तसेच कल्याण येथील सौ वंदना व अनिल बडगुजर (माई आजी,काका बाबा)तसेच वसई येथील सौ भाग्यश्री व श्री अजिंक्य कोतवाल (मामी ,मामा) बदोद्या येथील सौ जागृती व श्री विजय बडगुजर (मावशी ,काका)ह्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे व ही पूर्ण परिवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले आहे. त्याला मिळालेल्या या दैदिप्यमान यशा बद्दल चि. निलांशचे बडगुजर. इन टिम, बडगुजर प्राऊड ग्रुप कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

11 Comments

  1. अभिनंदन बाळा , तुला छान भवितव्य आहे , अशीच
    उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहो .

  2. चि निलांश दिपक बडगुजर पुणे याचे अभिनंदन!
    मान्यवर लेखक श्री लोकेश रविंद्र कोतवाल यांनी खुप छान लेख लिहिला.
    समाजोपयोगी उपक्रम आहे./डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर,अमरावती

    • Congratulations to Nilansh & Durvil Parents Very Small Age Group & Good Curiosity Keep it up Go Ahead💐💐🎉🎉👌👍

  3. Little Champ.Nilansh & Durvil Congratulations & Parents, Very Small Age Group Good Curiosity Go Ahead, Keep it up💐💐🎉🎉👌👍

  4. Congratulations to Nilansh & Durvil Parents Very Small Age Group & Good Curiosity Keep it up Go Ahead💐💐🎉🎉👌👍

  5. Congratulations to Nilansh Durvil Parents💐💐🎉🎉👌👍

  6. निलांश व दुर्विल माझे नातू असल्याचा मला फार अभिमान आहे…अशीच प्रगती करत रहा💐💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*