कु.पायल बडगुजर व कु. कांचन बडगुजर यांची अतुलनीय विजयश्री – श्री. अविनाश पंडीत बडगुजर, जळगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

यावल ह.मु.जळगांव येथील राहणार श्री.उत्तमराव सुदाम बडगुजर यांची नात व श्री. जितेंद्र उत्तमराव बडगुजर यांची मुलगी कु.पायल जितेंद्र बडगुजर व श्री. विलास उत्तमराव बडगुजर यांची मुलगी कु.कांचन विलास बडगुजर या सख्या चुलत बहीनींची अतुलनीय व बडगुजर समाजात शिरपेचात मानाचा तुर्रा तसेच नांव लौकिक मिळवून दिले व बडगुजर समाजाचे नाव उंच अशा शिखरावर पोहोचवले.

नागपूर येथे २१/०९/२०२१ रोजी झालेल्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाच्या संघात निवड झाली व त्यांची राष्ट्रीय स्पर्धा ही दिनांक २६/०९/२०२१ ते ३०/०९/२०२१ या कार्यकाळात पंजाब राज्यातील फगवाडा येथे आयोजीत केलेली स्पर्धा झाली. या स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र संघा कडून कु.पायल व कु. कांचन हीने टीम मध्ये आपले कौशल्य, नेतृत्व करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाच पण आपल्या महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक ही मिळवून दिले. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल कु.पायल बडगुजर व कु. कांचन बडगुजर यांचे बडगुजर युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, व 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🌹🌹

कु.पायल जितेंद्र बडगुजर

5 Comments

  1. Congratulations to Kum. Kanchan, Kum. Payal & Parents.Very good Sport Achievement Keep it up & Go Ahead💐💐🎉🎉👍

  2. Congratulations
    Ku.Kanchan Badgujar and
    Ku. Payal Badgujar and their parents and coaches for winning the trophy in sports at National level.
    👍👍👍👍🌹🌹🌹🎂🎂🎂💐💐

  3. कुं कांचन व पायल हीचे तसेच त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*