नंदुरबार येथील निल (निखिल) महेंद्र बडगुजर जूनियर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदकाचा मानकरी – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

नंदुरबार येथील निल (निखिल) महेंद्र बडगुजर हा 19kg जूनियर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदकाचा मानकरी ठरला आहे. निल महेंद्र बडगुजर हा 11वी सायन्स चा विद्यार्थी आहे, तो नंदुरबार येथील GTP कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. तसेच तो बॉक्सिंग चे प्रशिक्षण आबाजी स्पोर्ट्स क्लब नंदुरबार येथून घेत आहे. याआधीही निल ने विविध स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.

निल हा नंदुरबार येथील श्री. काशिनाथ फकीरा बडगुजर यांचा नातू व श्री. महेंद्र काशिनाथ बडगुजर यांचे चिरंजीव तर नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री रविंद्र काशिनाथ बडगुजर यांचा पुतण्या आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व प्राउड ग्रुप च्या वतीने हार्दिक अभिनंदन व उत्तुंग यशासाठी शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*