उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी. ई. (आय. टी.) 3rd वर्षे परिक्षेत जळगांव ची कु. श्रुती बिपिन पठार टॉप ५ मध्ये – श्री. पी. डी. बडगुजर सर, जळगांव

 जळगांव येथील सौ. शारदा व श्री. बिपिन पठार बडगुजर यांची सुकन्या यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील नुकत्याच झालेल्या (IT)आयटी इंजीनियरिंग परीक्षेत संपूर्ण विद्यापीठातून पाचवा क्रमांक मिळवीत समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याबद्दल कुमारी श्रुती बिपिन पठार चे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. 

अगदी बालपणा पासून हुशार असणाऱ्या श्रुतीने जळगांव येथील ए. टी. झांबरे विद्यालय, जळगांव येथून दहावी तर डिप्लोमा (आय. टी.) गव्हर्मेंट कॉलेज, जळगांव येथून शिक्षण घेतले आहे. तिला आधीपासूनच कॉम्युटरची विशेष रूची होती म्हणून तिने आय. टी. मध्ये करिअर करायचे ठरविले. तिला या डिजीटल जगातील सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे.

कु. कुमारी श्रुती बिपिन पठार असेच यश पुढील आयुष्यात संपादन करत राहो, समाजाचे नाव वृद्धिंगत करावे यासाठी…
अखिल भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती, विद्या प्रसारक मंडळ, जळगांव, अ. भा. ब. स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप, जय बडगुजर सेना यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा……

कु. श्रुती बिपिन बडगुजर

2 Comments

  1. इंजि.श्री बिपिन पठार साहेब आपल्या सुकन्येचे सुकुमारी श्रृतीदीदीचे अभिनंदन!
    श्री लोकेश कोतवाल सर,श्री पी डी बडगुजर सर खप छान बातमी नेहमीप्रमाणेच. / डॉ दिलीप, अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*