चोपडा येथिल कु.आयुषी राजेन्द्र बडगुजर ही नुकतीच पुढील उच्च शिक्षणासाठी परदेशात रवाना झाली. आयुषी बडगुजर ही सिंहगड काॅलेज पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स मधुन बी.ई.चे पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. तीने पुढील शिक्षणासाठी San Jose state university California येथिल विद्यापीठात Masters in electrical engineering — Specialization in networking ह्या विषयाची निवड केली आहे.
कु.आयुषी ही चोपडा सुदंरगडी येथिल राजेन्द्र वसंत बडगुजर यांची कन्या आहे. आयुषी बडगुजर ही नुकतीच कॅलिफोर्निया येथे उच्च शिक्षणासाठी रवाना झाले बद्दल तीचे बडगुजर समाज बांधवांनी तसेच कल्याण महानगरपालिकेत असलेले अनिल बडगुजर, अभिषेक बडगुजर, चिंचोली येथील लोकमान्य पिक सोसायटीचे व्हाईस चेअरमन मधुकर बडगुजर, सदाशिव बडगुजर, श्रीराम बडगुजर, जळगाव येथिल विवेक बडगुजर, कुणाल बडगुजर, सुहास बडगुजर, अंकुश बडगुजर, संजय बडगुजर यांनी अभिनंदन केले आहे.
आयुुषी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनिल बडगुजर व सौ वंंदना बडगुजर यांच्या होणा-या स्नुषा आहेेेत.
कु.आयुषी हीस पुढील वाटचालीस बडगुजर.इन वेबसाईट शुभेच्छा.
खूपच सुंदर असाच आपल्या समाजातील तरुण आणि तरुणी चांगले नाव कमवा आणि समाजाला पुढें घेऊन चला हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो…पुढच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा…