उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून आपल्या यशाने कु. अक्षदा हरीश बडगुजर ने रोवला मानाचा तुरा – श्री. पी. डी. बडगुजर सर, जळगांव

चोपडा येथील श्री. हरीश रघुनाथ बडगुजर व सौ. प्रतिभा हरिश बडगुजर यांची सुकन्या यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथील नुकत्याच झालेल्या (IT) आयटी इंजीनियरिंग च्या 3rd year परिक्षेत संपूर्ण विद्यापीठातून चौथा क्रमांक मिळवित समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अगदी लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या अक्षदाने याआधीही दहावी/बारावी मध्ये चांगले मार्क मिळवून यश संपादन केले आहे. तिला आधीपासूनच संगणकाची विशेष आवड होती म्हणून तिने आय. टी. हे क्षेत्र करिअर म्हणून निवड केले. तिला एक आधुनिक जगातील संगणक तज्ञ इंजिनिअर व्हायचे आहे.

त्याबद्दल कुमारी अक्षदा हरिश बडगुजर चे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. आजोबा श्री. रघुनाथ ओंकार बडगुजर, काका संदीप बडगुजर, काकू सौ. सरला संदीप बडगुजर, काका सुनील सिताराम बडगुजर (अकुलखेडा) जळगाव येथील श्री. पी.डी.बडगुजर सर , श्री. धिरज बडगुजर व सौ. प्रियंका धिरज बडगुजर यांनी विशेष कौतुक केले.
कु. अक्षदा हरीश बडगुजर असेच यश पुढील आयुष्यात संपादन करत राहो, समाजाचे नाव वृद्धिंगत करावे यासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप,
बडगुजर. इन टिमच्या यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा…

कु. अक्षदा बडगुजर

11 Comments

  1. Congratulations to Akshada Badgujar & Parent,Go Ahead💐💐👌

  2. कु अक्षदा तुझे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आई वडिलांचे देखील अभिनंदन

  3. अभिनंदन अक्षदा पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*