श्री. किरणचंद्र साळुंखेसर, ‘राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट संघ’ तसेच स्वराज्य पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने सन २०२१ चा “आदर्श शिक्षक”पुरस्काराने सन्मानीत : प्रा प्रशांत एच्. बडगुजर,पालेशा महाविद्यालय, धुळे

धुळेः येथील श्री.किरणचंद्र चंद्रकांत साळुंखे, उपशिक्षक,
श्रीमती सिताबाई शंकर माळी कन्या हायस्कूल,देवपूर धुळे,(२३वर्षे)यांचा काल बुधवार दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी,अभय युवा कल्याण केंद्र संस्था, राजीव गांधी माध्यमिक विद्यालय,देवपूर धुळे येथील भव्यदिव्य सभागृहात, स्वराज्य पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तसेंच राष्ट्रीय विश्वगामी ह्यूमन राईटस् संघ,धुळे या दोन संस्थेकडून “आदर्श शिक्षक पुरस्कार” मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

एकावेळी दोन संस्थांकडून “आदर्श शिक्षक” दुहेरी पुरस्कार बहाल करणेची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. श्री.किरणचंद्र साळुंखेसर हे धुळे महानगर(शहर) विज्ञान व गणित अध्यापकसंघ जिल्हा गणित व विज्ञान परिषदेचे अध्यक्ष असून,धुळे तालुका, जिल्हा पातळीवर विद्यार्थी परिषद गटा तून तसेच शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन सदस्य,धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे सचिव म्हणून आठ वर्षे भरीव कार्य, तसेंच विविध शाळांर्तंगत शालेय शिक्षण, पर्यावरणीय उपक्रमात तसेच विज्ञान व गणित विषयाचे अमूल्य मार्तगदर्शनाचे कार्य गत २३ वर्षापासून करत आहेत. विज्ञान प्रदर्शन राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद प्रकल्प सादरीकरण स्पर्धा परिक्षक म्हणून ही मोलाचे कार्य त्यांनी केले असुन ते सार्थदिशा बहुउद्देशिय शैक्षणिक संस्था देवपूर,संस्थापक अध्यक्ष आहेत. धुळे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.सी. डी.साळुंखे सर यांचे ते सुपूत्र आहेत.


सदर दुहेरी पुरस्कारामुळे श्री.किरणचंद्र साळुंखे सर यांचे,धुळे येथील विविध शैक्षणिक संस्था,जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शिक्षकवृन्द, मित्र- परीवार, तसेंच धुळे, जळगाव,चोपडा येथील बडगुजर समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अ.भा.बडगुजर समाज,बडगुजर.इन वेबसाइट (वेब पोर्टल टीम), बडगुजर्स प्रॉउड ग्रुप तर्फे श्री.किरणचंद्र साळुंखेसरांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील भरीव कार्यास शुभेच्छा.

श्री. किरणचंद्र साळुंखे सर

2 Comments

  1. Dear Kiran your very very congratulations from the bottom of our heart. From Dada and Aai. Jalgaon. I want to say Anna and Tai we are fully participateed in your Salunkhe. Family’s. Joy

Leave a Reply

Your email address will not be published.


*