तासभर ऑक्सिजन विकत देणारा डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर ऑक्सिजन देणारे झाडं यांचं महत्व आपल्याला सांगावे लागते. झाडे लावा जीवन वाचवा ची महत्त्वकांक्षा लक्षात घेऊन वृक्षरोपण करण्यात आले. हिरवीगार झाडे निसर्गानचे सोंदर्य वाढवत असतात. मनुष्या सोबत इतर प्राणी आणि पक्षी झाडांवर अवलंबून असतात झाडांची फळे हे प्राणी तसेच पक्ष्याचे अन्न आहे याशिवाय त्यांचे हेच निवासस्थान सुद्धा आहे. झाड म्हणजे देवाने मानवाला दिलेले अनमोल वरदानच आहे मानवी जीवन व झाडे यांच्यात अतुट नाते आहे. झाडे वायु, ध्वनी, व जल प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
“वृक्ष लावा दारोदारी,
समृद्धी नांदेल घरोघरी”
एका तऱ्हेने झाडे आपले पालन पोषण करत असतात. थोर समाजसुधारक महात्मे आपल्याला झाडांचे महत्व सांगून गेले. मनुष्यालाच तेवढ नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवांना जगवण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात .
ग्रामपंचायत पिंप्री यांचा आदर्श उपक्रम स्मशान भूमी परीसरात वर्षरोपण हे दि. ०३/०९/२०२१ सकाळी ९ वाजेला स्मशानभूमी परिसरात वृक्षरोपण करण्यात आले या वेळेस सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर (सरपंच) तसेच श्री. मंगल नामदेव पाटील (उपसरपंच) ग्रामविकास अधिकारी व सर्व सन्मानिय सदस्य व गावातील सन्मानिय नागरिक, ह. भ. प. श्री. देविदास पवार ( महाराज ) श्री. शंकर पवार, श्री. हेमराज बडगुजर, श्री. ताराचंद पवार, श्री. संजय मोहकर श्री. कैलास पवार, श्री. तुषार मोहकर, श्री. ईश्वर धोबी, श्री. अशोक चॊधरी सर, श्री. मनोज शर्मा, श्री. मोहन शिंदे, श्री. मनोज मालू, श्री. निलेश शर्मा (बालू शर्मा )
श्री. भानुदास शिंपी व ग्रामपंचायत कर्मचारी श्री. निलेश बडगुजर, श्री. सुभाष सोनवणे, योगेश कोळी उपस्थित होते
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे Iभविष्यासांठी आपली सोर रे II
*पिंप्री गृप ग्रामपंचायतीच्या कार्यास शत् शत् नमन*