वसई येथील श्री. दिपक बडगुजर हे लायन्स क्लब ऑफ इंटरनेशल तर्फे बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित – श्री. अविनाश बडगुजर, मुंबई

यावल, साकळी ह.मु.वसई येथील : सामाजिक कार्यकर्ते श्री.दिपक मधुकर बडगुजर हे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मा.उपाध्यक्ष,समस्त बडगुजर समाज मंडळ वसई, मा.अध्यक्ष, अ.भा.ब.स.म.समिती मा. उपाध्यक्ष, संचालक, तसेच श्री.दिपक बडगुजर यांनी ०१ जुलै २०१९ रोजी लायन्स क्लब ऑफ वसई युनिकचे अध्यक्ष पद स्विकारले.

दिपक बडगुजर यांचा बडगुजर समाजाला संघटित करण्यात आणि डिजीटल करण्यात फार मोठा सहभाग आहे. ते बडगुजर. इन च्या प्रमुख आणि फाऊंडर टिम मधील सदस्य आहेत. त्याच्या मार्गदर्शन व सहकार्याने बडगुजर. इन ला नविन दिशा व यश मिळत आहे. अल्पावधीतच या वेबसाईट ला लोकांची पहिली पसंती मिळविण्यात व समाज बांधवांना फक्त एका क्लिक वर अद्ययावत माहिती पोहचविण्यात श्री. दिपक बडगुजर यांची मोलाची भुमिका आहे.

कोरोना महामारीमुळे बाहेर जाणे ही मुश्किल होत होते, अशा वेळेस वसईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये लायन्स क्लब तर्फे साधारण दोन महिन्यामध्ये २० लाख रुपयांची औषधे देण्यात आली. सर्व शाळा
बंद होत्या अशा वेळेस ऑनलाईन शिकविणे चालू होते त्यावेळेस गरजू विद्यार्थांना त्यांनी चाळीस हजार रुपयांचे ०८ सॅमसंगचे नविन मोबाईल दिले त्यामुळे विद्यार्थांना ऑनलाईन अभ्यास करणे सोपे झाले.
काही दिवसांपूर्वी नुकताच वसईला वादळाचा फटका बसला त्यामध्ये बर्‍याच लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अशा वेळेस लायन्स क्लबने इतर क्लबचे सहाय्य घेवून एका विधवा बाईला घर बांधण्यासाठी रु.८५,०००/- पंच्याऐंशी हजाराचे सहाय्य केले.

दिपक बडगुजर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत साधारण
२४ ते २५ (चोवीस ते पंचविस) लाख रुपयांची कामे करुन एक वेगळाच कामाचा ठसा उमटविला.लायन्स क्लब ऑफ इंटरनेशनल संस्था अशा विविध सामाजिक संस्थासी निगडित असताना सन २०१९-२०२०चा नुकताच श्री.दिपक बडगुजर यांचा लायन्स क्लब ऑफ इंटरनेशनल तर्फे “प्रेसिडंट अवॉर्ड”शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले असून मुंबई उपनगरी परिसरातील समाज बांधवांनी व सामाजिक मंडळांनी अर्थात समस्त बडगुजर समाज मंडळ वसई, समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, वेब पोर्टल, बडगुजर.ईन यांच्या कडून पुढील सामाजिक वाटचालीसाठी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा! व अभिनंदन करण्यात आले.

6 Comments

  1. श्री. दिपक मधुकर शेठ बडगुजर यांस लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल तर्फे प्रेसिडेंट अवार्ड मिळाल्याने खुप आनंद झाला, अशिच दिवसें दिवस प्रगती होवो या सहा अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा……

  2. श्री माननिय दीपक मधुकर जी बडगुजर आपले मना पासुन फार फार अभिनंदन आपण समाजसेवा व समाजसंघटन कार्य उत्तम प्रकारे करीत आहात धन्यवाद
    आपला
    जगन्नाथ बी कोतवाल मुलुंडकर ह.मु.पुणे

  3. * ब.स.उ.मंडळ,मुंबई चा शिलैदार ,यशस्वी लढवय्या ,कल्पक ,श्री. दिपक मधुकर बडगुजर ,यांनी वर्ष भरात लायन क्लब तर्फे भरीव सामाजिक कामगिरी करून ,देशसेवा केल्या बध्दल ,श्री दिपक बडगुजर यांचा

    लायन क्लब ने प्रेसिंडेन्ट अवाॉर्ड प्रदान करून सन्मानीत
    केल्या बध्दल ,त्यांचे हार्दिक अभिनदन !
    यशस्वी भव !

  4. Congratulations to Shri.Dipak Badgujar ,President Award From Lion,s Club Vasai💐💐👍

  5. श्री.दिपक म.बडगुजर हे बडगुजर समाजात असो की इतर सामाजिक संस्था असो सर्व ठिकाणी अग्रेसर
    स्वतः एक पाऊल पुढे टाऊन सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत बडगुजर समाजाचे नांव रोशन करतांना दिसतात त्याना पुढील कामकाजासाठी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा!

  6. मान्यवर श्री दिपक बडगुजर सर आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!

    / डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

Leave a Reply to Ramesh Vamanrao Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*