बोदवड च्या चिमुकल्या श्रीमद बडगुजर ने केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर – श्री. बाळकृष्ण शिंदे, दोडांईचा

        जळगाव येथील डॉ अविनाश आचार्य विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकणारा विद्यार्थी श्रीमद प्रशांत बडगुजर, वय 9 वर्ष, याने दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर एका दमात यशस्वीरित्या सर केले आणि त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला.

        श्रीमद हा लहान वयातच जळगाव रनर्स ग्रुपचा सदस्य बनला. त्याचे वडील डॉ प्रशांत बडगुजर यांच्या मार्गदर्शनात रनिंग आणि ॲथलेटिक्स सराव हा श्रीमदला कळसुबाई शिखर गाठताना अत्यंत उपयोगी ठरला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संह्याद्री पर्वतारांगातील कळसुबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच 5349.5 फूट उंच आहे.  बहुतांश गिर्यारोहकांना तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या हौशी खेळाडूंना खुनविनारा हा ट्रेक आहे. शिखराच्या पायथ्याशी बारी नावाचे छोटेसे गाव आहे तेथून शिखरावर जाण्यासाठी पारंपरिक मार्ग आहे , तर दुसऱ्या बाजूने जहागीरदार वाडी नावाचे गाव आहे तेथून तुलनेने खडतर असा मार्ग शिखराकडे जातो. गिर्यारोहकांची क्षमता धाडस बघणारा मार्ग श्रीमद व त्याच्या सोबत असलेल्या गिर्यारोहकांनी निवडीला. श्रीमद सोबत त्याचे वडील प्रशिक्षित गिर्यारोहक डॉ प्रशांत बडगुजर आणि सिंगापूर येथे कार्यरत असलेले आय.आय.टी इंजिनियर श्री भारत राजपूत यांनी सकाळी 8.45 वाजता गिर्यारोहणाला सुरुवात केली. अवघड वाटा, काटेरी मार्ग, रस्त्यात आढळलेले साप व इतर वन्य प्राणी, नयनरम्य निसर्ग यांच्या सानिध्यात श्रीमद आणि टीमने दुपारी 12.15 वाजता ही मजल मारली. 
         कळसुबाई शिखर सर करणारा जळगाव जिल्ह्यातील तसेच बोदवड तालुक्यातील सर्वात लहान वयाचा गिर्यारोहक म्हणून श्रीमद् ने नावलौकीक केले आहे. ज्या लहान वयात मुलांना मोबाईलचे वेड असते त्या वयात श्रीमद रनिंग, अथलेटिक्स आणि गिर्यारोहन हे छंद जोपासत आहे. श्रीमदच्या या यशाबद्दल त्याची आई डॉ श्रेया बडगुजर,आजोबा श्री सुरेश बडगुजर बोदवड, आजोबा श्री.किरण शिंदे दोंडाईचा आजी, इतर नातेवाईक, वर्गशिक्षिका, जळगाव रनर्स ग्रुप श्री किरण बच्छाव आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर केंद्रीय मानवाधिकार संघटना नई दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ शिवचरण उज्जैनकर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री भागवत शेट राठोड, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ अजय पाटील, जिल्हा सचिव प्रा राजकुमार कांकरिया, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, तसेच सर्व पदाधिकारी यांनीदेखील श्रीमंद च्या यशासाठी त्याचे अभिनंदन केले आहे.चि. श्रीमद यांस बडगुजर. इन चा सलाम व भावी वाटचालीस शुभेच्छा.

2 Comments

  1. Congratulations to Little Champion Shrimad & Parent (To Achieve Top of Kalsubai Shikhar)💐💐👌

Leave a Reply to श्री विलासराव बडगुजर सर शिरपूर Cancel reply

Your email address will not be published.


*