अमळनेर,मु.प्रगत डोंगरी ह.मु.कल्याण (पूर्व) कै.जगन्नाथ वेडू बडगुजर (शिक्षक) व कै. कस्तुराबाई जगन्नाथ बडगुजर (शिक्षिका) यांचे सुपत्र, श्री.वसंत जगन्नाथ बडगुजर हे मोठे बंधु श्री.घनश्याम जगन्नाथ बडगुजर, सिनीयर इंजिनिअर आहेत व लहान बंधु श्री. राजेंद्र जगन्नाथ बडगुजर, बी.एम.सी.मुंबई येथे नोकरीला आहेत. श्री.वसंत जगन्नाथ बडगुजर यांचे शिक्षण बी.कॉम.एल.एल.बी. पर्यंत झाले आहे व अॅडव्हाकेट हायकोर्ट मुंबई व कायदेशीर सल्लागार आहेत व ते बडगुजर समाजाचे उत्कर्ष मंडळ चे सल्लागार ही होते.
त्यांनी आपण सर्व जण बघत आहोत की कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटे पेक्षा खुप भयकर होती. महामारीने व लॉक डाउन मुळे बरेच व्यक्ति ह्या आर्थिक अडचणीत होते. अशा काही परिवारामध्ये घरातले बरेच जीवनावश्यक वस्तु ची आवश्यकता भासत होती. अशा परिवाराची माहिती मिळवून व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले व त्या परिवारामध्ये कोरोना पीडित आर्थिक दुर्बल असलेल्या १०० परिवारांना किट व औषधी चे वाटप करुण मदत केली. अशा कोविड १९ च्या महा संकटात आपण एका योद्धा सारखे लढलात आपला देश आपली जबाबदारी या एकमात्र उद्देशाने नागरिकांचे आरोग्य स्वच्छता या माध्यमातून निस्वार्थ आणि अनमोल जनसेवा केल्याबद्दल राज्यव्यापी संघटनेच्या वतीने बुद्धिस्ट प्रेरणा गृप ( महाराष्ट्र राज्य) कोविड योद्धा, संकेत बहुउद्देशीय विकास संस्था शिवाजी नगर कल्याण, व श्री. विट्ठल सेवा मंडळ कल्याण ट्रस्ट या संस्था मार्फत कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौवरण्यात आले.















हार्दिक अभिनंदन व भविष्यात सत्कर्माची पुनरावृत्ती होत राहो – शुभेच्छा व प्रभूचरणी प्रार्थना
हार्दिक अभिनंदन ,!
माननीय अँड.वसंतराव बडगुजर साहेबांचे कर्तृत्वावर श्री योगेश बडगुजर सर यांनी खुप छान लिहिले आहे.
वकिलसाहेबांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
एडवोकेट वसंतराव बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन ?????