फागणे/धुळे : कृषी महाविद्यालय धुळे येथील कर्मचारी श्री. निंबा बाबुराव बडगुजर, लिपिक हे दिनांक ३१/०५/२०२१ रोजी नियत वयोमानानुसार विद्यापीठ प्रदीर्घसेवेतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.डी.देवकर साहेब, सहाय्यक कुलसचिव श्री.व्ही. टी. पाटील साहेब व डॉ. संदीप पाटील साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सहयोगी अधिष्ठाता कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यांना सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचा जीवनपट थोडक्यात आम्ही मांडत आहोत.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जीवनाला सुरुवात झाली लहानपणापासून शिक्षणाची आवड होती त्यामुळेच शाळेच्या वेळेच्या आधी सकाळी टोस्ट विक्री व खाजगी दवाखान्यात कंपाउंडर की करत दहावी पर्यंत शिक्षण घेतले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने दिवाळीच्या सुट्टीत व उन्हाळी सुटीत बाफना मोटर्स व श्रीराम मेडिकल स्टोअर्स, धुळे येथे काम करून शिक्षणाचा प्रवास चालू ठेवला. १९८१ मध्ये दहावी परीक्षा पास झाल्यानंतर कृषी महाविद्यालय धुळे येथे वडिलांचा जेवणाचा डबा पोहोच करण्याच्या निमित्ताने १९८२ पासून कृषी महाविद्यालय, धुळे येथे रोजंदारी मजूर म्हणून लागले हे काम करत असताना सकाळी ७.०० ते ११.०० विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे येथे शिक्षणासाठी व दुपारी ११.३० ते ६.०० वाजे पर्यंत कृषी महाविद्यालय, धुळे येथे ऑफिसचे कामकाज करुन शिक्षण व आई-वडिलांना आर्थिक मदत झाली व पुढे शिक्षण चालूच ठेवुन बी. कॉम. पर्यत शिक्षण पूर्ण केले.
वडील श्री. बाबुराव धोंडू बडगुजर हे ही कृषी महाविद्यालय, धुळे येथे कॉलेज ओपन झाल्यापासून (१९५९) ते १९९९ पर्यंत रोजंदारी मजूर म्हणून कामास होते. ते कायम न झाल्यामुळे १९८७ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ कामगार कर्मचारी युनियनची स्थापना केली व मा. न्यायालयात कायम होण्यासाठी केसेस दाखल केल्या. व कायम होणेसाठी लढा चालू ठेवला. धुळे जिल्हा न्यायालया पासून ते दिल्लीच्या सुप्रीम न्यायालया पर्यंत वकीला मार्फत केसेस चालवल्या. त्याचा निकाल त्यांच्या बाजूने २००० या वर्षी लागला. त्याची अंमलबजावणी २००३ या वर्षी झाली. अंमलबजावणी साठीही मोठ्या प्रमाणावरील लढा द्यावा लागला. मी १९८२ पासून ते २००२ पर्यंत रोजंदारी मजूर म्हणून कामास राहिलो. हे ही काम करीत असताना रात्र पाळी कृषी महाविद्यालय धुळे येथे व दिवसा पार्ट टाइम रेडीओलॉजिस्ट यांच्याकडे रिपोर्ट टायपिस्टचे ,चार्टर्ड अकाउंट कडे अकांऊट व ऑडिट क्लर्क म्हणून काम करीत राहिलो. नंतर २००३ मध्ये मा. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना शिपाई म्हणून नोकरी मिळाली. उत्कृष्ट कामामुळे नोव्हे. २०११ मध्ये लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली. कोणत्याही प्रकारचा निष्कलं, डाग न लागू देता इमाने इतबारे नोकरी करून दिनांक ३१/०५/२०२१ रोजी नियत वयोमानानुसार ५८ व्या वर्षी विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त झाले व त्यांना कृषी महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे या संस्थे मध्ये चेअरमन पदावर ही कार्यरत आहे. थोडक्यात त्यांना मिळालेली नोकरी ही सहजासहजी मिळाली नसून त्यासाठी आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक संकटांना तोंड देऊन खूप प्रयत्न करून मिळालेली आहे.
याच काळात त्यांची किडनी व आता नुकतेच हृदय शस्त्रक्रिया (बायपास सर्जरी) झाली होती त्यांतून ते बरे झाले आहेत. श्री. निंबा बाबुराव बडगुजर, कै. श्री. नारायण जगन्नाथ बडगुजर, श्री. संजय विठ्ठल बडगुजर, श्री दिनकर भिका बडगुजर, श्री विलास वामनराव बडगुजर व प्रा. श्री सुरेश यशवंत बडगुजर व फागने येथील समाज बांधव एकत्र येऊन यांच्या मदतीने क्षत्रिय बडगुजर समाज युवक संघटनेची स्थापना केली व त्यांत बरेच युवक कार्यकर्ते जोडले गेले या मार्फत अनेक कामे केली. व त्यांनी मिळून समाजदर्शिका या पुस्तक प्रकाशित केले व हे विनामूल्य बडगुजर समाज बांधव यांना वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील कार्यामुळे त्यांना डॉ. मनिभाई देसाई राष्ट्रसेवा अवार्ड २००९ मध्ये आदिवासी विकास मंत्री मा. नामदार श्री. बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौवरवन्यात आले तसेच बडगुजर दर्शन चा उल्लेखनीय समाज कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नुकताच श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे महासचिव मा. श्री राजेंद्र भालचंद्रशेठ बडगुजर, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, मुकटीचे प्राचार्य मा. श्री ईश्वर हरचंदशेठ बडगुजर, बडगुजर समाज शिक्षण संस्थेचे वस्तीगृह अधिक्षक व धुळे नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन मा. श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर व बडगुजर समाज शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री अशोक सितारामशेठ बडगुजर यांनी फागणे येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने त्यांना सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुख-समृद्धी भरभराटीचे व आरोग्यदायी जावो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करुन त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

अशा या प्रभावी व्यक्तीमत्वास बडगुजर. इन टिमकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक अभिनंदन व पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि भरभराटीचे जाओ ही शुभेच्छा.






माननीय श्री निंबा बाबुराव बडगुजर साहेबांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा!
श्री प्रणव कोठवाल सरांनी श्री निंबा सरांचा प्रेरक जीवनआलेख खुप छान रितीने शब्दांकित केला.अभिनंदन श्री प्रणव सरांचे.बडगुजर वेब पोर्टल टिम ला शुभेच्छा./ डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती