संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Program – UNDP) द्वारे अदिती किशोर बडगुजर हिस Verbal Commendation अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे!
UNDP अंतर्गत “आशिया युथ इंटरनॅशनल मॉडेल युनाइटेड नेशन्स”द्वारे हि परिषद दरवर्षी घेतली जाते. यामध्ये जगातील जवळपास सर्वच देशातील विधार्थी सहभागी होतात. यावर्षी देखील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या रिसर्च पेपर्स मधून ८९० फायनल स्पर्धकांमध्ये अदितीची निवड झाली. यावर्षी कोरोना महामारीमुळे हि कॉन्फरन्स दि. २८ ते ३१ मे दरम्यान ऑनलाईन भरविण्यात अली होती. अदिती सध्या ओमान या देशात कुटुंबासोबत राहत असून तिने कुवैत या देशावर शोधनिबंध सादर करून त्या देशाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिला Verbal Commendation हा अवॉर्ड जाहीर होऊन तो ३१ मे रोजी ऑनलाईन प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची काही क्षण आपण बघू शकता.



अदिती किशोर बडगुजर (मूळ गांव बहाद्दरपूर, पारोळा ) हल्ली मुक्काम मस्कत, ओमानसध्या विश्वकर्मा कॉलेज ऑफ टेकनॉलॉजि, पुणे येथे दुसऱ्या वर्षाला कॉम्पुटर इंजिनीरिंगचे शिक्षण घेत आहे. अदितीचे वडील किशोर देविदास बडगुजर, सध्या ओमान येथे डिव्हिजनल चीफ इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. तसेच आई, समिता यांनी विशेष मेहनत घेऊन अदितीला या स्पर्धेमध्ये मार्गदर्शन केले. अदितीला कॉम्पुटर क्षेत्रात विशेष आवड असून – इंजिनीरिंगच्या अभ्यासासोबत ती विविध स्पर्धांमध्येही उत्साहाने भाग घेत असते असे तिची आई आवर्जून सांगते.
अदितीचे आजोबा-आजी सौ. सयाबाई व श्री. देविदास बडगुजर, (निवृत्त ग्राम विकास अधिकारी) बहाद्दरपूर यांनी आणि सौ. आशाताई आणि श्री. भास्कर पवार, मालेगाव (मुळगाव म्हसावद) यांनी अदितीला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, अदितीला पुढील करिअरसाठी बडगुजर.इन वेबसाईट तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

Congratulation mam
Congratulations Aditi. All Badgujar society proud of you. You are from a well educated and reputed family. So keep shining your family and your home town ,that is Bahadarpur
We hope for your bright future. ??????
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. . ! ? अदिती.
जागतिक स्तरावर सादर केलेल्या शोधनिबंध सादरीकरणात पुरस्कार मिळवून आपले व समाजाचे नाव जागतिक स्तरावर झळकवले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अदिती तुला भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. . ! ?
सुकुमारी इंजि.अदिती किशोर बडगुजर-ओमान यांंचे अभिनंदन! आनंद वाटला.मातापित्याचे अभिनंदन.
बडगुजर वेब पोर्टल समाज विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करते./डॉ दिलीप-
सौ स्वाती बडगुजर,अमरावती
Congratulations
Congratulations Aaditi and best wishes for future
Congratulations Aditi