जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला – श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर पिळोदा ता. अमळनेर (जळगांव) ह. मु.ऐरोली नवी मुंबई

आमची आक्का – स्मृति सोडून गेली

 माझ्या जीवनातील सोमवार २२मार्च २०२१ ची सकाळ अत्यंत धक्कादायक ठरली ! आमचे भाचे श्री. भुषण यांनी "आक्का आपल्यात राहिली नाही तिचे पहाटे ४:३० वाजता जळगांव येथे रुग्णालयात दु:खद निधन झाले"
 मनसुन्न करणारी बातमी ऐकून आवक् झालो व क्षणार्धात भूतकाळात गेलो. आमच्या आक्काचा सर्व जीवन पट व आठवणी डोळ्यासमोर तरळ लागल्या श्री. सुरेश मगन बडगुजर यांची धर्मपत्नी कै.सौ. विजयाबाई सुरेश बडगुजर (पिळोदा)येथील

माहेर, कै.पितांबर सखाराम शेठ व श्रीमती. सुशिलाबाई पितांबर बडगुजर यांची जेष्ठ कन्या ….. आणि आम्ही भावंडे तिला आक्का म्हणूनच बोलायचो.
कोरोना सारख्या महामारीत चोपडा शहर व परिसर अगोदरच ग्रासलेला आणि श्री.सुरेश शेठ व आमची भाची चोपडा रुग्णालयात उपचार घेत असतानाच आमच्या आक्काला या महामारीने ग्रासले व यातच त्यांचे दु:खद निधन झाले.
आमच्या आक्काचे बालपण, शिक्षण अगदी आनंदात गेले. अभ्यासात हुषार, शांत सुस्वभावी साधी राहणी असं व्यक्तिमत्त्व व आवाजात गोडवा होता. गायनाच बाळकडू आम्ही तिच्या कडूनच घेतले आमचे मेहुणे श्री.सुरेश यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. बालपणीच पितृछत्र हरपल्याने सर्वस्वी कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली अथक परिश्रमातून सामाजिक राजकीय क्षेत्रात ठसा उमटविला तसेच मुलां मुलींचे शिक्षण, संसार, सुयोग्य रित्या थाटले. शेती, व्यापार क्षेत्रात अग्रेसर असून कुटुंबाची प्रगती करुन समाजात नांव लौकिक करतांना या त्यांच्या यशात आमच्या आक्काचा महत्त्वपूर्ण सहभाग होता व सिंहाचा वाटा होता.
आपल्या घरी आलेल्या अतिथी समाज बांधव भगिनी यांची आपुलकीने विचारपूस व आदरातिथ्य करत असे नेहमी हसत मुख, व्यक्तीत्त्व, साधी राहणी व उच्च विचारसरणी असं आमच्या आक्काच व्यक्तीत्व होतं.
आक्काने पिळोदा व चोपडा येथील दोघेही बाजू समर्थपणे साधल्या यात श्री. सुरेश शेठ यांचं मार्गदर्शन अमुल्य आहे आणि या जीवन प्रवासात संपुर्ण परिवार कै. अन्नपूर्णा यांची सेवा, मुले, मुली, भाऊ, बहिणी नातवंड यांची समर्थपणे सांभाळ केला त्यातच आमच्या आक्काचा आनंद होता. काशी यात्रा, तीर्थक्षेत्र प्रेक्षणीय स्थळे समाजातील सुख दु:खात सहभाग त्यांनी अनुभवला. समाजातील चोपडा येथे कोणी आले तर चला…… सुरेश भाऊ कडे जाऊन येऊ! असं वैभव आमच्या आक्काने निर्माण केलं आमच्या आक्काच परिवारातील सर्वांवरच अतोनात प्रेम, प्रचंड कष्ट, मेहनती, सहशीलता साधा स्वभाव होता.
अनेक आठवणी येतात कंठ गहिवरतो जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला आक्काच असं अचानक आमच्यातून जाणं अत्यंत दु:ख दायक आहे! मनाला चटका लावून जाणारी घटना आहे
परमेश्वर आमच्या आक्काच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो हीच ईशवर चरणी प्रार्थना व श्रध्दांजली अर्पित करतो.
समस्त बडगुजर परिवाराला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना! …………

शब्दांकन — श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर पिळोदा ता. अमळनेर (जळगांव) ऐरोली नवी मुंबई
आमच्या आक्कास हिच मन:पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल :-
श्री. सुरेशशेठ मगन बडगुजर
श्री. भूषण सुरेशशेठ बडगुजर
सौ.कविता आत्माराम शेठ बडगुजर (मुलगी)
सौ. आश्विनी जयेश शेठ बडगुजर (मुलगी)

श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर (भाऊ)
श्री. विजयकुमार पितांबर बडगुजर (भाऊ)
सौ.मनीषा संजय बडगुजर( बहीण)
समस्त पालटशा परिवारकडून मन:पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली

3 Comments

  1. कै.विजयाताई!
    यांचे आकस्मिक जाणे खरोखर मनाला चटका लावणारे असून सुरेश बडगुजर आणि परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,सदर दुःख सहन करणेची शक्ती संपूर्ण परीवारास परमेश्वर देवो.*//भावपूर्ण श्रद्धांजली\\*

  2. प्रत्येक ओळ आणि ओळ सत्य आहे, आईने प्रत्येकावर निस्वार्था प्रेम केले, आमच्या घरी येणाऱ्याची आपूलकी ने विचारपुस करणे, अडलेल्याला तिच्या परीने शक्य हाईल तेवढी मदत करणे यामुळे प्रत्येकाला आमच्याकडे भेट दयायला आवडायचे.आई आम्ही हे लहानपणा पासून पाहत आलो आहोत हा तुझा ठेवा आम्ही जपण्याचा प्रयत्न करू…अशीमायाळू आई,पत्नी,मुलगी,वहीनी,बहीण, सासू , आजी,मामी,काकू,आत्या होणे दुर्मीळ… आई तुझी उणीव आम्हाला कायम भासत राहील.. भावपूर्ण श्रध्दांजली….

  3. भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली???

Leave a Reply to श्री विलासराव दंगल सेट बडगुजर शिरपूर Cancel reply

Your email address will not be published.


*