नाशिक येथील उभरता युवा तारा हरपला – कै. सुरज राजेंद्र बडगुजर

मनी होता भोळेपणा,
कधी न दाखवला मोठेपणा !
अजूनही होता भास,
तुम्ही आहे जवळपास !
शांती लाभो तुमच्या आत्म्यास,
हीच विनंती परमेश्वरास !

कै. राजेंद्र भिका बडगुजर यांचे द्वितीय चिरंजीव व श्री. किशोर भिकाशेट बडगुजर, दिपक भिकाशेट बडगुजर यांचे पुतणे कै. सुरज राजेंद्र बडगुजर यांचे दि. २७/१२/२०२० (रविवार) रोजी सकाळी ६.०० वा वयाच्या ३१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. रविवारी त्यांचा पार्थिवावर पंचवटी येथील सार्वजनीक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतत हसतमुख, मनमिळाऊ असणारे सुरज आपल्यातून गेल्याने त्यांचा परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले, परमेश्वर अलोने परिवारास हे दुःख पेलण्याची शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

सुरज राजेंद्र बडगुजर यांचा जन्म हा दिनांक २८/०५/१९८९ रोजी झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक लहान मुलगा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

कै. सुरज यांस अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि समस्त वेब पोर्टल टिमतर्फे विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली ????

2 Comments

  1. ?? भावपूर्ण श्रद्धांजली ??
    त्यांच्या आत्म्यास चिरशांति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
    ओम शांति ! ओम शांति ! ओम शांति !

  2. चंद्रकांत पितांबर ब ड गुजर ऐरोली नवी मुंबई
    January 5, 2021 at 9:46 am

    भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply to चंद्रकांत पितांबर ब ड गुजर ऐरोली नवी मुंबई Cancel reply

Your email address will not be published.


*