पारोळा येथील श्री बालाजी हॉस्पिटल,कोवीड केअर सेंटर, पारोळा रुग्णांसाठी सज्ज – डॉ. निखिल बडगुजर(नंदवालकर), धुळे

पारोळा येथील मा. उमेश आप्पा करोडपती सर यांच्या संकल्पनेतून कोविड केअर सेंटर आज दि 5 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आले आहे. कोविड सेंटरचे उद्घाटन जळगांव ग्रामीण चे खासदार मा. दादासो उन्मेष पाटील व माजी आमदार पारोळा विभाग मा. अण्णासाहेब डॉ. सतिशराव पाटील व माजी अध्यक्ष अ. भा. ब. स. महासमिती श्री उमेश आप्पासाहेब करोडपती,श्री संजय दिगंबर बडगुजर फागणे, श्री.शामभाऊ दिगंबर नंदवालकर फागणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. सदर कार्यक्रमास समाजातील तसेच प्रभागातील बरेचसे मान्यवर उपस्थित होते.

लोकांना सेवा देण्याच्या उद्देशाने पारोळा येथे कोविड सेंटर ची स्थापना झालेली आहे. या कोवीड सेंटर मध्ये धुळ्याचे डॉ.मयूर नंदवाळकर M.D Medicine. डॉ. सचिन बडगुजर B.D.S डॉ. राहुल कुवर, BAMS व डॉ. मनीष पाटील BAMS या निष्णात डॉक्टरांची टीम रुग्णांना सेवा प्रदान करणार आहेत.

बालाजी कोविड केअर सेंटर मध्ये रूग्णसेवा आणि रुग्णांना अतिशय सुलभ व्यवस्था आणि आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे, रूग्णसेवा हिच खरी ईश्वर सेवा यानुसार आम्ही कार्य करणार आहोत असे डॉ. सचिन उमेश करोडपती यांनी सांगितले.

बालाजी कोविड केअर सेंटरला अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर. इन टिम तर्फे हार्दिक शुभेच्छा. आप्पासाहेब जे बोलतात ते प्रत्यक्षात पण पुर्ण करतात याची प्रचिती त्यांनी कमी वेळातच कोविड सेंटर सुरू करून दिली. नेतृत्व कसे असावे यावरून त्यांनी दाखवून दिले. हा बडगुजर समाजासाठी एक नविन आदर्श ठरेल.

3 Comments

  1. उमेशआप्पा खरच् ग्रेट हं:
    तुम्ही नाशिकहून घरी आलात दुसरेंदिवशी आपण फोनवर बोललो होतो त्यावेळेस पारोळ्यात कोवीड सेंटर सुरूं करायचा मनोय आज प्रत्यक्षात आला.आप्पा तुमचे निमंत्रण असून मी येऊ शकत नसल्याचे सांगितलेवर कार पाठविणेची तयारी दर्शवली तरिही मी धुळेहूनच शुभेच्छा देतो म्हटलेवर क्षणाचाही विलंब न लावतां माझ्या अनुपस्थितीसाठी होकार दिला यातच सर् आले.अभिननंदन आणि शुभेच्छाll

  2. बालाजी हॉस्पिटल व कोविड सेंटरचे उदघाटन केलायाबद्दल आपल्या परिवाराचे व सहकार्यी मित्रांचे अभिनंदन व शुभेच्छा..!

    आपल्या हातुन सदैव अशाच प्रकारे समाजसेवा व रूग्णसेवा घडत राहो…

    आई चामुंडा मातेचा आशिर्वाद व कृपासदैव आपल्या पाठिशी राहो..

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*