श्री. सुदेश पुरषोत्तम दातेराव यांनी आपले जेष्ठ समाजबांधव यांना प्लाझमा दान – आपले जेष्ठ समाज सेवक लवकरात लवकर बरे होवोत ही प्रार्थना – श्री. अमोल वासेवाय, अमरावती

अमरावती येथील समाज बांधव श्री. सुदेश पुरुषोत्तम बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात करत केली. ते अमरावती येथे फळभाज्या मार्केट मध्ये व्यावसायिक आहेत. अमरावती येथील जागतिक पातळीवर आपल्या पैलवानीचा ठसा उमटविणारे स्व. श्री. नारायणराव दातेराव यांचे ते नातू आहेत. अमरावती येथील जेष्ठ समाज सेवक यांना प्लाझमा थेरेपी ची गरज आहे याची माहिती मिळाली. सदर माहिती अमरावती येथील आरोग्य सेवक सदैव मेडिकल विषयक कार्यात तत्परतेने मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. अजयभाऊ दातेराव यांच्या सहकार्याने श्री. सुदेश दातेराव यांना कळाले. व रक्तगट ही सारखा असल्या कारणामुळे ते लगेचच तयार झाले.

श्री. अजय दातेराव, सामाजिक कार्यकर्ते, अमरावती

श्री. सुदेश दातेराव हे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. माझी त्यांच्याशी ओळख तशी माझ्या बालपणापासूनच आहे. मावशी कडे गेलो की सुदू भैय्या नेहमीच आमच्या सोबत बोलायचे मार्गदर्शन करायचे. त्यांचे विशेष प्रेम आणि खिलाडी वृत्ती मुळे ते परिवारातील लाडके सदस्य.

आम्ही सर्व त्यांना प्रेमाने सुदू भैय्या म्हणतो. सुदू भैय्या आज आपण केलेला प्लाझमा दान मुळे आपले जेष्ठ समाज बांधव यांना नक्कीच फायदा होईल व ते लवकरात लवकर बरे होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्व समाज बांधव बडगुजर समाज.

श्री. सुदेश पुरषोत्तम दातेराव, अमरावती

टिप : सदर लेखात कोरोना पेंशट चे नांव टाकले नाही. ते सार्वजनिक करणे योग्य नाही. ते लवकरात लवकर बरे होवो हिच ईच्छा.

1 Comment

Leave a Reply to Yashwant K Chavan Cancel reply

Your email address will not be published.


*