कोरोना महामारीच्या काळात सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे, तसेच *सामाजिक देणं* याची जाण असने हेही खूप महत्त्वाचे आहे. याचे भाण ठेवत *चोपडा येथील प्रविमं 1992 मित्र परिवार* या समुहाच्या सदस्यांनी जि. प. शाळा घोडलेपाडाच्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची अनोखी अशी आरोग्यदायी वस्तू भेट दिल्या आहेत.
*(प्रविमं) प्रताप विद्या मंदिर, चोपडा जि. जळगाव येथील सन 1992 च्या 10 वी तील विद्यार्थ्यांचा समुह.* या समुहाचे सदस्य असलेले व जि. प. शाळा घोडलेपाडा ता. शहादा येथे कार्यरत असलेले शिक्षक रविंद्र मोहन बडगुजर यांच्या हाकेला ओ देत समुहाचे काही सदस्यांनी मदत केली. यामध्ये श्री तुलसीदास पाटील, श्रीमती माधुरी कावले (पाटील), श्री विशाल जोगी व स्वतः रविंद्र बडगुजर व दुसरे मित्र श्री गणेश शेट (नासिककर) यांनी जिल्हा परिषद शाळा घोडलेपाडा ता. शहादा येथील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन निमित्त आरोग्यदायी भेटवस्तु दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने *थर्मोमिटर (IR Gun) - 1 (नग) तापमान मोजण्यासाठी, Oxymeter - 1 (नग) ऑक्सिजन लेव्हल व पल्स रेट मोजण्यासाठी, Sanitizer - (5 लि.) हात स्वच्छ करण्यासाठी, Sodiyam Hypochlorite - (5 लि.) शाळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी, Face Shield - 20 (नग), Peddle operated Sanitizer dispenser - 1 नग, Gloves, व शिक्षकांना PPE Kit - 4 नग* इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
श्री राजू पावरा, श्रीमती यमुना चव्हाण, श्री रविंद्र बडगुजर व श्री वसंत पावरा या सर्व शिक्षकांनीही आपला सहभाग देत बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनसाठी *Face Shield व Mask* (120 नग) ची उपलब्धता करुन देऊन शाळेतील कोणताही विद्यार्थी या सुविधांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली आहे.
आपलाच नाही तर गरीब विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचा विचार करत ह्या वस्तू भेट देऊन अनोख्या पद्धतीने *कोणाचा वाढदिवस तर कोणाच्या लग्नाचा वाढदिवस* साजरा करुन रक्षाबंधनाची भेट दिली आहे आहे.
अश्या सर्व आरोग्यदायी वस्तूंनी सुसज्ज अशी जि. प. शाळा घोडलेपाडा *केंद्रातील प्रथम* जिल्हा परिषदेची शाळा झाली आहे.
ह्या सर्व वस्तू बडगुजर सरांनी केंद्रप्रमुख श्री मोहनजी बिस्नरीया, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आमलाल पावरा, काही पालक, व गावकरी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री राजू पावरा सरांना दि. 10/ 08/ 2020 रोजी सुपूर्द केल्या. (काही अडचणीमुळे हा कार्यक्रम उशीरा घेण्यात आला.) *यावेळेस सर्वांनी सामाजिक अंतर व सुरक्षेच्या नियमांचे पालन केले.*
अभ्यासिका वाटप :
वरील मान्यवरांच्या उपस्थितीत *शाळा बंद पण अभ्यास चालू* या उपक्रमांतर्गत *ऑगस्ट* महिण्यातील *अभ्यासिकेचे प्रकाश करुन* शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात 3 विद्यार्थ्यांना व बाकी सर्व विद्यार्थ्यांना *घरोघरी* जाऊन वाटप केले.
ह्या आरोग्यदायी भेटवस्तूंबद्दल सर्वच मान्यवरांनी, पालक व ग्रामस्थांनी दात्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व अभ्यासिकेचे कौतुक केले.


Leave a Reply