? सर्व बडगुजर समाज बांधवांना ?
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मार्फत विनम्र आव्हान
सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती की कोरोनाच्या महामारीत आपण आजपर्यंत आपल्या बऱ्याच समाज बांधवांना मुकलो.आज पासून आपण सकल्प करू यापुढे आमच्यातील कुणीही समाज बांधव या महामारीत प्राणास मुकणार नाही म्हणून गावोगाव च्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील कुणाही समाज बांधावास प्राथमिक लक्षण दिसल्यास त्वरित त्यांना सरकारी दवाखान्यात भरती करण्यासाठी सहकार्य करून.त्यांच्या घरातील लोकांना समजावून त्यांना वेळ न गमावता दवाखान्यात भरती करा, कोरोना प्राथमिक स्टेजला असल्यास लवकर आटोक्यात येतो.म्हणून प्रत्येक गावातील अध्यक्षांनी /कार्यकर्त्यांनी /समाज बांधवांच्या संपर्कात राहून जेणे करून या पुढे कुणीही समाज बांधव प्राणास मुकणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती. सध्या कोरोणाची खूपच भीती असल्याने प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्यात काहीही लक्षणे दिसली तरी सुद्धा कोरोणाची टेस्ट करत नाहीत किंवा डॉक्टरांना दाखवत नाही.तरी असे न करता/न घाबरता कोरोणाची टेस्ट करावी टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर आपल्यास त्वरित उपचार करता येतात व जीवित हानी१०० % टाळता येईल.
श्री.माधवराव जानकीराम बडगुजर
(अध्यक्ष अ.भा.बडगुजर समाज महासमिती)
श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर
(सचिव अ.भा.बडगुजर समाज महासमिती)

Leave a Reply