अमरावती :
Indian School Of Development Management या सुप्रख्यात शैक्षणिक संस्थेत चि.शुभम याची पी.जी.प्रोग्राम अंतर्गत पुढील शिक्षणासाठी परीक्षेद्वारे निवड होऊन दोन लाख रु.ची स्कालरशिपही प्राप्त केली आहे. विकास नियोजन क्षेत्रात पुढे करिअर करावयाचे त्याचे ध्येय आहे.
सध्या तो सी.एम.फेलो म्हणून अकोला जि.प.येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सोबत कार्यरत आहे. पुढील शैक्षणिक सत्रात तो उच्च शिक्षणासाठी जाणार आहे.
तो डॉ. दिलीप धोंडू बडगुजर व महिला समाज भुषण सौ.स्वाती बडगुजर अमरावती यांचा चिरंजीव असून त्याचा लहान भाऊ चि.सुबोध हा IIT कानपूर येथे M.S. करीत आहे.
मित्रमंडळ व समाज बांधव चि.शुभमच्या या सफलते बद्दल आनंद व्यक्त करीत शुभेच्छा देत आहेत.
ISDM या सुप्रसिध्द संस्थेत प्रवेश घेणारा तो पहिला बडगुजर विद्यार्थी आहे; हे विशेष!
चि. शुभम यांस अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप तसेच समस्त वेब पोर्टल टिम कडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. असाच यशाचे शिखर गाठून समाजाचे आणि आई वडिलांचे नांवलौकिक आपल्या हातून होवो ही सदीच्छा.


बडगुजर वेब पोर्टल टिम
तथा सर्व मान्यवरांचे आभार!
नमस्कार!
Shubham che khup khup abhinandan from sunil madhukar(karodo ati), ulhasnagar
अभिनंदन
Congratulations