जळगाव येथील उत्तम उपक्रमशील समाजसेवक महाराष्ट्र पोलीस दलातील ए.टी.एस. विभागातील – श्री. प्रदीप विश्वनाथशेठ बडगुजर यांना सेवक सेवाभावी संस्था जळगाव येथील महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2020 जाहीर. आदरणीय प्रदीपशेठ बडगुजर हे एक मनमिळावू व मितभाषी अस व्यक्तिमत्व होय. सदैव जनहितार्थ, रक्षणार्थ अशा पद्धतीने कार्यतत्पर सेवा देत असतात. त्यांना 15 ऑगस्ट 2016 रोजी राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच लॉक डाऊनच्या काळात कोरोना वर मात म्हणून जीवाची परवा न करता सदैव लोककल्याणासाठी उभे राहिले आहेत. म्हणून त्यांना सेवक सेवाभावी संस्थेतर्फे कोरोना योद्धा सन्मान पत्र प्राप्त झालेले आहे.
श्री. प्रदीप बडगुजर हे बडगुजर प्राऊड ग्रुपचे जेष्ठ मार्गदर्शक आहे. नेहमीच समाजातील युवकांना प्रेरणा देत असतात. तरी या यशाबद्दल त्यांना युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप व सर्व समाज बांधव यांच्यातर्फे त्यांच सर्वत्र अभिनंदन होत आहे.


श्री. प्रदीप विश्वनाथ बडगुजर,( जळगांव ),
आपल्याला ,जळगांव येथील सेवक सेवाभावी संस्थेने महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२० प्रतिदिन करून,आपला सन्मान केला. यामुळे समाजाचा तसेच पोलीस खात्याचा सुध्दा गौरव झाला आहे !
आपले हार्दिक अभिनंदन !