समाजातील नवीन उन्दमुख तारा -: प्रितम राजु बडगुजर – श्री. अनिल बडगुजर, खेतीया

धुळे-: समाजात समाजाच्या सर्वांगीण विकास साध्य करणेसाठी प्रौढ, महिला, डॉक्टर्स, इंजिनियर,वकील,व्यापारी, नोकरदार व महाविदयालयीन तरुण तरुणी आपला काहीसा वेळ समाजहितासाठी देत आहेत आणि यापुर्वी देखील दिलेला आहे. समाजाची प्रतिष्ठा व मानसन्मान वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा राज्य एवढेच नव्हेतर देश पातळीवर उंचाविण्याचा महामेरु प्रयत्न समाजबांधव भगिनी तरुण वर्ग आपल्या विविध कलाकोशल्याद्वारे करित आहेत. यामुळे समाजाच्या नावलौकिकात अजुनही भर पडत आहे. यामध्ये धुळे येथील समाजातील नवीन उन्दमुख तारा प्रितम राजु बडगुजर.
प्रितम राजु बडगुजर या तरुणाचे लहानपणापासुनच चंचल व खोडकर
स्वभाव ! शिक्षण डिप्लोमा इन सिव्हील पर्यंत झालेले. मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्याची ईच्छा व यामध्ये करिअर करावे या जिद्यीने पेटलेल्या तरुणाने स्वता:च्या बळावर Event Management Pritz’s Criystal Planner कंपनी ची स्थापना १ वर्षापुर्वी केली. तरुणांमध्ये विविध कलागुण कौशल्य याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्लेटफॉर्म मिळावा या हेतु समोर ठेवुन प्रितम ने तरुणांना संधी उपलब्ध करुन देत आहे. प्रितमने धुळे जिल्हातच नव्हेतर नाशिक, मुंबई, पुणे व औरंगाबाद या प्रमुख शहरात आपले Event चे जाळे पसरविण्यास सुरुवात केलेली आहे.
आपल्या Event सोबत रास गरबा चे क्लासेस व वर्कशॉप प्रितम गेली ५ वर्षापासुन सांभाळत आहे. यात रास गरबाचे महाराष्ट्रीयन,राजस्थानी व गुजराथी शैलीवर आधारीत नृत्य प्रितम बेखुबीने सादर करित आहे. यामुळे ही दुसरी ओळख प्रितम सातत्याने देत आहे. यात परिक्षकाची भुमिका पारदर्शकपणाने देवुन जनसामान्याच्या मनात प्रितम आपल्या व्यक्तिमत्वाचा इतर राज्यात जावुन आपल्या शैलीचा ठसा उमटत आहे.
प्रितम या Event घेवुन थांबला नाहीतर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा
अजुन कसा वेगळा पध्दतीने उमटता येईल हे ध्येय समोर ठेवुन नुकतेच Mr & Mrs Asia Glamour – २०२० स्पर्धा मॉडलिंग क्षेत्रात कार्य करणा-या तरुण तरुणी करिता पार पडली. यात आशियाई देशातील तरुण तरुणींना संधी देण्यांत आली. भारतातील कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, मुंबई व पुणे या महानगरातील शहरी तरुणांनी सहभाग घेतला. स्पर्धातील विविध खडतर टप्पे पार करित प्रितम बडगुजर याने हे शिवधनुष्य पेलुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्रातील अत्यत कमी तरुणाना संधी देण्यात आली. यात प्रितम बडगुजर उत्तर महाराष्ट्रात एकमेव सेमी फायनालिस्ट ठरला हे विशेष ! या Asia Glamour २०२० प्रतियोगिताच्या निवड समितीवर कला व फिल्मी क्षेत्रातील नामांकित हस्ती महेशजी भट, रॉडीज रन विजयसिंग, प्रिन्सेस नोरुला, उर्वशी रातुला, फिल्म ऍक्टर सोनु सुद व गुलशन ग्रोवर यांनी सहभागी प्रतियोगिताकडुन विविध कार्य पार पाडुन काहीना डिसक्लाफाईड करुन सेमी फायनालिस्ट जाहीर केले यात आपल्या खान्देश भुमीची मान गौरवाने उंचविणारा प्रितम बडगुजर यादीत समाविष्ट झाला. हा आनंद खराच गगनात मावेनासा असाचा आहे. येत्या काही दिवसात फायनालिस्ट करिता असणारा
महत्वाचा टप्पा प्रितमला पार करावयाचा आहे. यात प्रितम यशस्वी झालाच तर पाच लाख, मॉडलिंग क्षेत्रातील करार, नवीन फिल्म करिता दिग्दर्शक सोबत करार व सोबत ऑडी कार चा मानकरी फायनालिस्ट होणार आहे. आज प्रितम अगदी जवळ या स्वप्नांच्या पोहचलेला आहे. कदाचित आपल्या आई सुनिता वडिल राजु बडगुजर आजी आजोबा व समाजातील वरिष्ठांच्या आशिवार्दाने नक्कीच मिळवु शकेल यात शंका नाही. चला तर सर्वांनी या उन्दमुख कलाकरांच्या भविष्यासाठी प्रार्थना करुया आणि यशाच्या शिखरांवर विराजमान होण्याचे स्वप्न बघण्याचे साक्षीदार होऊया आई बिजासनी मातेला साकडे घालुया आणि समाजाचा अभिमानाचा तुरा सर्वकडे पसरुया!
जय आई बिजासनी माता ! जय हिंद जय महाराष्ट्र!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*