अभिनंदन !अभिनंदन !अभिनंदन !
धरणगांव,ह.मु.बदलापूर येथील श्री.धनंजय विक्रम बडगुजर हे पोस्ट खात्यात असल्यामुळे जनसंपर्क येत असल्याने व सामाजिक कार्याची त्यांना सुरुवातीपासून आवड असल्याने सध्या बडगुजर समाज मंडळ अंबरनाथ,बदलापूर खजिनदार (कोषाध्यक्ष),“ब.स.उ.मं.बृन्मुंबई कोकण परिसर” सहसचिव, भारतीय टपाल डाक डोंबिवली पश्चिम शाखेत पोष्टमन कर्मचारी सैवाभावीपणे काम करीत आहेत.
पोस्टात नेमणुक असल्याने भारतीय टपाल डाक खात्यातील मिळणाऱ्या शासकीय योजनांचा सर्व सामान्य जनाना माहिती समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा !
अगदी मनमिळाऊ स्वभावी व्यक्तीमत्व, डोंबिवलीत घरोघरी पत्र टाकतांना,वाटेत भेटणाऱ्या समाज बांधवांचे घरी जावून आवजूर्ण विचारपुस करतात ! असा संपर्क त्यांनी तयार केला आहे !
भारतीय टपाल डाक डोंबिवली पश्चिम शाखेत पोष्टमन म्हणून काम करणारे धनंजय वि बडगुजर लाॅकडाउन उठल्यावर कोरोना परिस्थितीत सुद्धा कोरोना योद्धा लोकांना पत्र घराघरात पोहचविण्याचे काम करीत आहेत त्याबद्दल त्यांचे अ.भा.ब.स.युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर.इन, वेब पोर्टल टीम व ओबीसी समिती उप प्रमुख एस् एम् बडगुजर यांचे कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!


Leave a Reply