जनमत प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी बडगुजर समाज बांधवाची निवड : आदर्श शिक्षक – प्रा. मिलिंद चिंधु बडगुजर, जळगांव आदर्श समाज सेवक – श्री. सुनिल रघुनाथ कोतवाल, कुर्हे पानाचे, श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

बडगुजर समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सेवक सेवाभावी संस्था जळगाव जनमत प्रतिष्ठान यांच्यामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कार वितरित केले जात असतात .जनमत प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रकारची सेवाभावी कार्याचे आयोजन करत असते. यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे, कपड्यांचे वाटप तसेच दरवर्षी शंभराहून अधिक गरीब विद्यार्थी दत्तक घेण्याचे कार्य जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्यामार्फत केले जात असते. आजच्या कोरोना महामारी च्या काळात सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र धडपडत अनेक गरजूंना दररोज नाश्ता तसेच जेवण व दैनंदिन संसारिक वस्तूंचे वाटप करण्याचे कार्य जनमत प्रतिष्ठान करत आहे. संस्थेमार्फत दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्यिक ,कवी, लेखक ,समाजाचे प्रेरणास्थान ,आदर्श शिक्षक, महिला समाजसेविका ,ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक ,उत्तम शेतकरी, तसेच स्वच्छता कामगार अशा विविध क्षेत्रातील समाजसेवेचे व्रत घेऊन समाजाप्रती जागृत असणाऱ्या मान्यवर व घटक यांचा सन्मान व सत्कार जनमत प्रतिष्ठान मार्फत केले जात असते. त्यांना अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कार दिले जात असतात. यावर्षी सुद्धा सदर संस्थे मार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. यात जवळपास दोनशेच्यावर प्रस्ताव प्राप्त झालेले होते. त्यात आपल्या बडगुजर समाजातील सुद्धा विविध शिक्षक, साहित्य ,कवी ,लेखक व समाजसेवक यांनी मानांकन प्रस्ताव सादर केले होते.

सन 2020 या वर्षीच्या अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कारांमध्ये बडगुजर समाजातील तीन व्यक्तींना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कार प्राप्त झाला असून त्या संदर्भाचे निवड पत्र संबंधितांना पाठविण्यात आले आहे. यात आपल्या बडगुजर समाजासाठी अभिमानाची बाब म्हणजे त्यात कुर्हे येथील समाज सेवक म्हणून श्री. सुनिल रघुनाथ कोतवाल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची ही पावती आहे.

श्री. सुनिल रघुनाथ कोतवाल, कुर्हे पानाचे

तसेच पुणे येथील बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर वेब पोर्टल चे क्रिएटर श्री. लोकेश रविंद्र कोतवाल यांना सुद्धा त्यांनी राबवलेल्या विविध समाज सुधारक कार्य, शैक्षणिक कार्य, रोजगार सेवा व मार्गदर्शक कार्य प्रित्यर्थ राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर आदर्श समाजसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .

श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

या दुग्धशर्करा योगा सोबतच बडगुजर समाजातील धानोरा तालुका चोपडा येथील नामदेवराव भावसिंग पाटील जुनियर कॉलेज येथील कार्यरत प्राध्यापक श्री मिलिंद चिंधु बडगुजर राहणार चिंचोली तालुका यावल यांचीसुद्धा राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे .त्यांनी आपल्या शाळेत तसेच गाव व समाजात राबविलेल्या उपक्रमा प्रित्यर्थ त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रा. मिलिंद चिंधु बडगुजर, जळगांव

सदर पुरस्कारांचे वितरण जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन या आपल्या बडगुजर समाजातील तिघांचा गौरव करण्यात येणार आहे.तद्वतच या अगोदरच जळगाव येथील श्री. संतोष भाऊ बडगुजर यांना सुद्धा जनमत प्रतिष्ठान मार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे. सदर पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्वांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीच्या वतीने तसेच बडगुजर प्राऊड ग्रुपच्या वतीने त्रिवार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.

एक पाऊल माणुसकी कडे सलाम तुमच्या कार्याला पुनश्च तिन्ही निवड पात्र समाजसेवक व शिक्षक यांचे अभिनंदन.

1 Comment

  1. सर्व समाजबंधंचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*