नागपुरच्या रोहित बडगुजर ने कोरोना विषयी नागपूर पोलीस कमिशनरेट साठी बनविलेला व्हिडीओ ठरला सुपर हिट – श्री. निखिल बडगुजर, नागपूर

कोरोना विरुद्ध सर्व जगच युद्ध लढत आहे. यात नागपुरातील रोहित बडगुजर कोरोना संदेश वहन करण्यासाठी नागपूर पोलीस विभागासाठी तयार केला व्हिडीओ.

विशेषतः रोहितला ही संधी नागपूर पोलीस कमिशनर यांनी दिली. रोहित हा एक कुशल दिग्दर्शक आहे. या आधीही रोहित ने बरेचशे अल्बम शूट केलेले आहे आणि ते सुपरहिट पण ठरलेले आहे. त्यापैकी बारीश आणि सुकुन हे अल्बम तर फारच लोकप्रिय ठरलेत.

रोहितला ही डॉक्युमेंटरी बनवायची ऑफर चक्क नागपूर पोलीस यांच्याकडून आली. नागपूर पोलिस डिपार्टमेंट ला एक भारगस्त असा संदेश जनतेला द्यावयाचा होता. त्यासाठी त्यांना योग्य व्यक्तीचा शोध होता. आणि त्यांनी रोहीत ला ही संधी दिली. त्यासंधीचे रोहित ने सोने करत त्यांना अपेक्षित होता एक मौल्यवान संदेश देणारा माहितीपट तयार केला आणि अल्पावधीतच त्याला भरभरून प्रतिसाद भेटला.

सदर व्हिडीओ चे लेखन, दिग्दर्शन व एडिटिंग चे काम रोहित बडगुजर यांनी केले असून क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून शैलेश नरवाडे तसेच सिनेमॅटोग्राफर चे काम माही गेहलोत यांनी तर ज्योत्सना ग्लोरी यांनी व्हाईस ओवर आर्टिस्ट चे काम पाहिले.

या माध्यमातून तो जनतेला जनजागरण करू शकला याचा त्याला आनंद झाला तसेच देशातील तमाम जनतेला एक महत्वपूर्ण संदेश या व्हिडीओ मार्फत देण्यात आला आहे.

शुटिंग करते वेळी रोहित बडगुजर आपल्या टिम सह

तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या संकल्पनेमुळे आणि सहकार्यामुळे हा व्हिडीओ बनविला त्या सर्व पोलिस दलाचे हार्दिक आभार मानले. तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यासर्वांचे हार्दिक आभार रोहित ने मानले आहेत.

या व्हिडीओ मार्फत रोहित ने एक चांगला संदेश अधिक प्रभावीपणे बनवून दिला. तसेच आरोग्य सेवक आणि कोरोना योध्दा हे करीत असलेल्या जनसेवे विषयी सुध्दा त्यांने आभार व्यक्त केले. रोहित च्या या कलाकौशल्यास युवक समिती, प्राऊड ग्रुप आणि समस्त बडगुजर. इन टिमचा सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

युवा डायरेक्टर, लेखक, इडिटर रोहित बडगुजर

1 Comment

  1. छान.. सुंदर.. बढिया…
    अभिनंदन. . ! ? व पुढील वाटचालीस शुभेच्छा. . ! ? रोहित कुमार

Leave a Reply to रविंद्र मोहन बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*