प्रा. मधुकर कोटवे (बडगुजर) सर दिल्ली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा लाईव्ह सेशन संपन्न – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

सलग पंधरा वर्षांचा स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेले, स्पर्धा परीक्षा स्पेशलायझ तसेच एन एफ ए दिल्लीचे फाउंडर आणि डायरेक्टर प्राध्यापक मधुकर कोटवे (बडगुजर) सर दिल्ली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेशन पार पडले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थींसाठी स्पर्धापरीक्षांमध्ये येणारे अडथळे, समस्या यांचे योग्य निदान प्राध्यापक मधुकर कोटवे ( बडगुजर ) सरांमार्फत केले गेले. यावेळेस विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून थेट प्राध्यापक कोटवे सरांशी संपर्क साधला. समाजातील स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजातीलच ज्येष्ठ तसेच तज्ञ मार्गदर्शकांचा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. त्याबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यापूर्वी २०१८ साली प्रा. मधुकर कोटवे सरांचे जळगाव याठिकाणी प्रत्यक्ष मार्गदर्शनपर क्लासचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
समाजातील प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमी अखिल भारतीय युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप हे कार्यशील असतात. या सर्व प्रयत्न करणाऱ्या युवकांना प्रा. मधुकर कोटवे सर यांचे नेहमीच मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन असते त्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे जाहीर आभार. ???

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*