छत्रपती फाऊंडेशन तर्फे एक हात मदतीचा कोरोनाशी लढा हा अभिनव उपक्रम – श्री. सागर संजय बडगुजर, धुळे

धुळ्यातील गोरगरीब तसेच गरजू व्यक्तींना मदत कार्यात नेहमी अग्रेसर असणारी छत्रपती फाऊंडेशन संस्था ही कोरोना विरुद्धच्या लढाईत सुद्धा मदती साठी पुढे आली आहे. आज प्रत्येकाला वाटत की आपणही काही सामाजिक जबाबदारी उचलावी, आपणही कुणालातरी काहीतरी मदत करावी. या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना मदतीचा हात म्हणुन किराणा साहित्य देण्याचा, त्यांच्या घरातील चूल विझू नये. यासाठी एक छोटासा प्रयत्न छत्रपती फाऊंडेशन धुळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

समाजातील सामाजिक कार्यकर्ते धुळ्यातील देविदास कृष्णाराव बडगुजर यांचे नातु व संजय देविदासशेठ बडगुजर याचे चिरंजीव इंजि. सागर संजय बडगुजर छत्रपती फाऊंडेशन चे उपाध्यक्ष हे आहेत व तसेच श्री. लक्ष्मीकांत अनंतराव बडगुजर याचे चिरंजीव देवेंद्र लक्ष्मीकांत बडगुजर हे सचिव म्हणून संपुर्ण कामकाज बघत असतात.

छत्रपती फाऊंडेशन मार्फत रोजंदारी करुन पोट भरणार्‍या मजुरांच्या घरातील चुल पेटावी म्हणून मदत कार्यची सुरुवात केली आहे. तरी समाजातील दानशुर व्यक्तींनी या सार्थक कार्यास पुढे येऊन छत्रपती फाऊंडेशन मार्फत चालवलेल्या या कार्यास सढळ हाताने मदत करावी ही विनंती. असे आवाहन फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.

कोरोना हारणार……. देश जिंकणार……….
घरात रहा सुरक्षित रहा..

Leave a Reply

Your email address will not be published.


*