NIRD, हैद्राबाद यांचे कडून घेण्यात आलेल्या पंचायत राज योजना परीक्षेत जळगांव येथील श्री. संजय जगन्नाथ बडगुजर हे तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

नुकताच NIRD, हैद्राबाद व YASHADA, पुणे याच्या कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला त्यामध्ये जळगांव येथील श्री. संजय जगन्नाथ बडगुजर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सदर परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे आता ते पंचायत राज योजने विषयीचे राज्यस्तरावर तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देऊ शकतील.

केंद्र व राज्य शासनाच्या कुठल्याही ग्रामीण विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करीत असताना योजना राबविणारे शासकीय कर्मचारी व तळागाळातील लाभार्थी यांचे मध्ये जो पर्यंत योजनेविषयी प्रशिक्षणाच्या माध्यमातून जाणीव जागृती करून योजना समजून दिली जात नाही, तो पर्यत शाश्वत व परिपूर्ण विकासाचे पर्व पूर्ण होत नाही. अशी प्रशिक्षणे देणेसाठी विषयाचे परिपूर्ण ज्ञान, अनुभवी व क्षमता असणाऱ्या तज्ञ प्रशिक्षकाची शासनास आवश्यकता असते. त्यासाठी केंद्र शासनाने केद्र शासन स्तरावर National Institute of Rural Development (NIRD) , हैद्राबाद या संस्थेची तर महाराष्ट्र शासनाने YASHADA, पुणे या संस्थेची स्थापना केलेली आहे सदर संस्थेमध्ये योजने निहाय विषयाचे परिपूर्ण ज्ञान, अनुभवी व क्षमता असणाऱ्या शासकिय व अशासकीय व्यक्तींना १ ते ७ दिवसापर्यंत प्रशिक्षक म्हणून निवासी प्रशिक्षण दिले जाते. व नंतर सदर तज्ञ प्रशिक्षक जिल्हा, तालुका, गांंव पातळीवरील शासकीय कर्मचारी व तळागाळातील लाभार्थी योजनेविषयीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करून योजना यशश्वितेसाठी मार्गार्दर्शन करतात. श्री. संजय जगन्नाथ बडगुजर, अध्यक्ष- मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव हे गेल्या २३ वर्षापासून YASHADA, पुणे या संस्थेकडून ग्रामीण विकासाच्या विविध विषयामधील प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये “तज्ञ प्रशिक्षक” म्हणून काम करीत आहेत. त्यामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, हरियाली योजना, जलस्वराज्य प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान, माहितीचा अधिकार, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, जल साक्षरता अभियान, पंचायात राज सदस्य क्षमता बांधणी इ. योजना समाविष्ठ आहेत.

तज्ञ प्रशिक्षक म्हणून काम करताना वेळोवेळी केंद्र किवा राज्य स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणे आवश्यक असते त्याच अनुषगाने गेल्या ५ महिन्यापूर्वी १ ते ४ आक्टोबर १०१९ पर्यंत NIRD, हैद्राबाद व YASHADA, पुणे याच्या कडून PACE प्रशिक्षण केंद्र, ओरंगाबाद येथे “ TIS PRI’s – पंचायात राज या विषयी Orientation and Assessment Programme of State Level Master Resource Person (MRP’s) या संदर्भात सादरीकरण व परीक्षा घेण्यात आली. या मध्ये तज्ञ प्रशिक्षक म्हणून विषय मांडणी, विषय प्रस्तुती, सत्र व्यवस्थापन, आज पर्यत तज्ञ प्रशिक्षक म्हणून दिलेली प्रशिक्षणे या बाबत NIRD, हैद्राबाद व YASHADA, पुणे यांचे कडील परीक्षकांनी ४ दिवस अध्ययन करून गुनांकन केले होते.
नुकताच NIRD, हैद्राबाद व YASHADA, पुणे याच्या कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ६० प्रशिक्षकानी परीक्षा साठी उपस्थित होते त्या पैकी फक्त २२ प्रशिक्षक अ ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले, त्या मध्ये श्री संजय जगन्नाथ बडगुजर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सदर परीक्षा उतीर्ण झालेमुळे ते पंचायत राज योजने विषयी चे राज्यस्तरावर तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देऊ शकतील .

श्री संजय जगन्नाथ बडगुजर हे गेल्या २५ वर्षापासून स्वयंसेवी संस्थेच्या मध्यमातून काम करीत आहेत. तसेच श्री. संजय बडगुजर हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व असून ते विविध सामाजिक कार्यात आणि समाज विकासासाठी कार्य करीत असतात. ते अ. भा. ब. स. महासमिती चे माजी सचिव, विद्यमान संचालक सदस्य आहेत. त्यांना जलमित्र ही ख्याती प्राप्त झालेली आहे. ते राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या विविध उपक्रमात सहभागी असतात. तसेच दिल्ली येथे झालेल्या अटल भुजल योजनेच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातून विशेष अतिथी म्हणून श्री. संजय बडगुजर यांना बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी मार्गदर्शन केले होते. श्री. संजय बडगुजर यांना आपले कुलदैवत मा चामुंडा, आई वडिलाचे आशीर्वाद व आपले समाज बांधवाच्या प्रेरणेमुळे ५१ व्या वर्षी ते प्रथम क्रमांकाने परीक्षा पास झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि समस्त वेब पोर्टल टिम तर्फे हार्दिक अभिनंदन करतो व पुढेही अशीच यशस्वी वाटचाल सुरू ठेवावी यासाठी हार्दिक शुभेच्छा.

श्री. संजय जगन्नाथ बडगुजर, जळगांव

4 Comments

  1. संजय जगन्नाथ बडगुजर हे NIRD ने घेतलेल्या परीक्षेत प्रथम क्रंमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल व राष्ट्रीय स्तरावर बडगुजर् समाजाचा गौरव वाढविल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन सुनील

  2. Congratulations Sanjay Bhau
    Your in-depth knowledge on the subject is acknowledged & will help the Rural development in coming times.
    Proud of you . Great.
    We would like to see you at Mah Govt . Boarders & Samaj bhandhavs lets see him to go to higher heights. Kudos. DL Badgujar,

  3. माननीय श्री संजय जगन्नाथ बडगुजर सर यांचे अभिनंदन!
    शुभेच्छा सर.
    चांगला माहितीपुर्ण लेख!
    / डा दिलीप बडगुजर -सौ.स्वाती बडगुजर
    अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*