पुणे येथील गरजू समाजबांधवांस बडगुजर प्राऊड ग्रुप व www.badgujar.in वेब पोर्टल टिमकडून मदत – श्री. विनोद मोहकर, पुणे

कोरोनाने सध्या संपूर्ण जगात तसेच देशामध्ये थैमान घातलं आहे. अशात या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या परिस्थितीमध्ये सर्वांचा रोजगार हिरावला आहे विशेषतः ज्यांचे हातावर पोट आहे, अश्या गरजू बांधवांची घरची परिस्थिती बिकट होत चालली आहे. आपण अशा वेळी गरजूंच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. अशाच एका समाज बांधवाची माहिती बडगुजर प्राऊड ग्रुप सदस्य श्री. लोकेश कोतवाल यांना श्री. विनोद मोहकर, पुणे यांनी दिली. त्या समाज बांधवास नितांत गरज होती, अशी माहिती मिळाली. याविषयी ग्रुपच्या काही सदस्यांना याविषयी कळविले तर त्यांनी पुढाकार घेऊन लगेचच मदतीची तयारी दर्शविली. त्या समाज बांधवास मदत करण्यात आली. पुणे येथील गरजू समाजबांधवाला बडगुजर प्राउड ग्रुप व वेब पोर्टल टिम कडून मदत म्हणुन एक महिन्याचा किराणा देण्यात आला. याकरीता विशेष सहाय्य प्रा. विक्रांत पालटशहा यांनी घेतले व श्री. प्रशांत रामलाल बडगुजर, श्री. विनोद मोहकर, श्री. लोकेश कोतवाल यांनी सहकार्य केले.

अशा या परिस्थितीत गरजू बांधवांना मदत करून आपणही खारीचा वाटा उचलावा, या उदात्त हेतूने बडगुजर प्राउड ग्रुप तसेच वेब पोर्टल टिम, अ. भा. ब. स. युवक समिती मदत कार्य करीत आहेत. आणि हे सर्व आपल्या सारख्या समाज बांधवांच्या सहकार्याने करता येत आहे.

ही बातमी फक्त आणि फक्त आपण आपल्या गरजू समाज बांधवांना मदत करावी याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून प्रसारित करीत आहोत. यात कोणाताही प्रसिद्धी चा हव्यास नाही. या कठीण काळात आपण आपल्या समाजबांधवांच्या आणि देशाच्या पाठी उभे राहून माणुसकी धर्म जोपासावा. धन्यवाद.

4 Comments

Leave a Reply to Nandlal pawar bhusawal Cancel reply

Your email address will not be published.


*